मोजक्या घरामध्ये होतो जन्माष्टमीचा सण
गणेशोत्सवात गणपती घरोघरी विराजमान होत असतो. अगदी तसेच विदर्भात फार क्वचित घरांमध्ये जन्माष्टमीला कान्होबाचे पूजन होते. लाकडे यांच्या घरी दीड दिवस कान्होबाचे पूजन केले जाते. त्यासाठी संपूर्ण परिसरच एकत्र होतो आणि सगळे मिळून मोठ्या उत्साहात हसत खेळत, नाचत गात हा सण साजरा करतात. भजन, कीर्तन गुलाल उधळून मध्यरात्रीपर्यंत कृष्ण जन्माष्टमीचा आनंद हा आगळावेगळाच असतो. गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा कायम असल्याचे मालाताई लाकडे यांनी सांगितले.
advertisement
चोर दहीहंडी का साजरी करतात, काय आहे यामागील परंपरा?
अशी सुरू झाली परंपरा
100 वर्षांपूर्वी लाकडे यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळ जन्माला आलं. त्याचं नाव श्रीकृष्ण ठेवलं आणि तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झाली अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. काही दिवसांपासूनच जन्मोत्सवाची सुरुवात केली जाते. डेकोरेशन, फराळ, नैवेद्य, फुलोरा यासंदर्भात कामाला सुरुवात होते आणि मोठ्या उत्साहात दीड दिवसाच्या कान्होबाचा पाहुणचार, पूजन, आदरातिथ्य केलं जातं, असं मालाताई लाकडे यांनी सांगितलं.
Video: 2 इंचाचा नंदी पाहिलात का? पाहा कसा बनतोय लाकडाचा नंदीबैल?
बालकृष्णाचा हलवला पाळणा
रात्री बारा वाजता कृष्णजन्म झाल्यावर बाळ कृष्णाचा पाळणा हलविण्यात आला. कृष्ण नामाचा गजर करत फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि प्रसाद वाटण्यात आला. यावेळ सर्वजण भजन कीर्तनाच्या नादात दंग होते. जन्माष्टमीला गुलालाची उधळण करून होळीचे स्वरूप परिसरातील नागरिकांनी दिले. मध्यरात्रीपर्यंत गुलाल आणि पाण्याची उधळण सुरू होती दरवर्षी हेच चित्र जन्माष्टमीला लाकडे यांच्याकडे दिसते, असेही कुटुंबीय सांगतात.