श्री गणेश सांगतात, मित्र आणि जवळच्या नातेवाईकांकडून मदत मिळू शकते. अनावश्यक वाद टाळा. काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. कठोर परिश्रमामुळे करिअरमध्ये यश मिळू शकते. समवयस्क व्यक्ती तुमचं कौतुक करतील. जोडीदाराला वचनबद्धता दाखवण्यासाठी दिवस चांगला आहे.
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Brown
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, भावंड किंवा जवळच्या मित्राशी जोरदार भांडण होऊ शकतं. त्यामुळे संयम बाळगा. बाहेर जेवायला जाल. जमिन किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. दूरच्या ओळखीतून पैसे मिळतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल.
Lucky Number : 6
Lucky Colour : Crimson
Golden Baba: 23 किलो सोने, 27 लाखांचे घड्याळ; हे 'गोल्डन बाबा' कोण होते?
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, भावंडांशी वाद झाल्याने चिंता वाढेल. दिवसभर थकवा जाणवेल. मनसोक्त खाणं आणि टीव्ही पाहात विश्रांती घेतल्यावर आता व्यायाम करण्याची वेळ आली आहे. तुमच्याकडे खास कौशल्य आहे. तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श करता, तिचं सोनं होतं. जागरूक राहा. कारण ज्या व्यक्तीशी उर्वरित आयुष्य शेअर करायचं आहे, अशी व्यक्ती तुम्हाला भेटू शकते.
Lucky Number :17
Lucky Colour : Lavender
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, प्राथमिक माहिती आणि अफवा यातील फरक ओळखा. आज तुम्ही निश्चिंत असाल. आरोग्य कमकुवत असेल. त्यामुळे ताण घेऊ नका. प्रयत्न केल्यास नफा मिळू शकतो. तसेच पैसे देखील कमवता येतील. नुकत्याच भेटलेल्या एखाद्या व्यक्ती सोबत डेटवर जाताना दोनवेळा विचार करा.
Lucky Number : 18
Lucky Colour : Indigo
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुमचा कल तात्त्विक विचारांकडे असेल. मुलं नकारात्मक विचार करत आहेत असं वाटू शकतं. आरोग्याची काळजी घ्या. विविध स्रोतांतून पैसे मिळू शकतात. तुमच्या आणि जोडीदारामध्ये कोणीतरी उभं ठाकलं आहे. त्यामुळे आता कृती करण्याची वेळ आली आहे.
Lucky Number : 9
Lucky Colour : Sandy Brown
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, न्यायालयात कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एखादं वाईट स्वप्न पडल्याने त्रस्त असाल. त्यामुळे रात्रीच्या वेळी विश्रांती घेणं कठीण होईल. नोकरी नीरस वाटू शकते. नात्यासाठी दिवस चांगला आहे. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे स्वभाव चांगला राहील.
Lucky Number : 2
Lucky Colour : Orange
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुमचा कल तत्त्वज्ञानाकडे असेल. तुम्ही निवांत मूडमध्ये असाल. आरोग्य चांगले राहील. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करण्याची ही वेळ नाही. विवाहाची तारीख निश्चित करण्यासाठी दिवस चांगला आहे.
Lucky Number : 7
Lucky Colour : Yellow
Ganesh Chaturthi 2024: अष्टविनायकाच्या 8 गणपतींचा हा आहे इतिहास! तुम्हाला माहिती आहे का?
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, वडिलांशी संबंध ताणले जातील. तुम्ही बाहेर जेवायला जाऊ शकता. कोणत्याही प्रकारचा वाद तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. तुम्हाला चांगल्या कामासाठी बक्षीस मिळेल. जोडीदाराच्या निष्ठेबद्दल मनात असलेला अविश्वास तुम्हाला त्रासदायक ठरेल.
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Red
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, अनपेक्षित समस्या तुमच्या रोजच्या गोष्टीत व्यत्यय आणू शकतात. अनावश्यक वाट टाळा. डोक्याला दुखापत होण्याची शक्यता असल्याने सावध राहा. सट्टेबाजांनी जास्त सावधगिरी बाळगावी. कामादरम्यान नवीन लोकांशी भेट होईल. लवकरच तुम्हाला तुमचा सोबती मिळू शकतो.
Lucky Number : 11
Lucky Colour : Violet