अयोध्या : सनातन धर्मात हरितालिकेचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिकेचा सण साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या वैवाहिक जीवन सुखी आणि आनंददायी राहावे, यासाठी उपवास करतात.
हरतालिकेच्या दिवशी मुख्य रुपाने भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा अर्चना केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, याच तिथीला महादेवाने माता पार्वतीला पत्नीच्या रुपात स्विकार केले होते. त्यामुळे तुम्हीही जर हरतालिकेचा उपवास करत असाल तर पूजेचे साहित्य आणि पूजा नेमकी कशी करावी, याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. याचबाबत आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
अयोध्येतील ज्योतिष पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिकेचा उपवास केला जातो. या वर्षी हरतालिकेचा उपवास हा 6 सप्टेंबरला केला जाईल. हरतालिकेच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची आराधना केली जाते.
Ganeshotsav Pune : गणपतीसाठी सुंदर देखावे सेट घ्यायचेय तर पुण्यातील हे ठिकाण तुमच्या कामाचं, VIDEO
काय आहे पूजेचे साहित्य -
हरतालिकेच्या पूजेदरम्यान, भगवान शंकर आणि माता पार्वतीची मूर्ती, दिवा, अगरबत्ती, धूपबत्ती, तूप, पान, वाती, कपूर, सुपारी, नारळ, चंदन, नैवेद्यासाठी केळे, कळस, आंब्याचे पान, केळीचे पान, धोत्रा फूल, बेलचे पान, 16 श्रृंगारच्या सर्व वस्तूंचा समावेश करावा.
पूजा विधी काय आहे -
हरतालिकेच्या दिवशी पूजेच्या वेळी सकाळी उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे, व्रताचे व्रत करावे, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, पूजेचे ठिकाण नीट स्वच्छ करावे, लाल रंगाचे कापड टाकावे आणि त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतींसह गणेशाची स्थापना करावी. यानंतर पूजा अर्चना करावी. तसेच भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे आणि माता पार्वतीला श्रृंगाराचे साहित्य अर्पण करावे. त्यानंतर शेवटी आरती करून प्रसाद वाटप करावा, अशी माहिती त्यांनी दिली.
सूचना - ही माहिती ज्योतिष, आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.