वाराणसी : महाशिवरात्री म्हणजे महादेवांना प्रसन्न करण्याचा सुवर्ण दिवस. त्यामुळे शिवभक्त या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी महादेव आणि पार्वती देवींचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा 8 मार्चला महाशिवरात्र साजरी होईल. त्यावेळी पूजा कशी करावी जाणून घेऊया.
ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेवांच्या पूजेत बेलपत्राचा समावेश न विसरता करावा. कारण बेलपत्र हे महादेवांना विशेष प्रिय असतं. तसंच त्यांना गंगेच्या पाण्याचा अभिषेक करावा.
advertisement
विरुष्काचं बाळ प्रचंड भाग्यवान! दुर्मीळ योगात झाला जन्म, 'असा' असेल त्याचा स्वभाव
अक्षता आणि काळे तीळ करावे अर्पण
ज्योतिषांनी सांगितलं की, बेलपत्र अर्पण केल्यानंतर, गंगेच्या पाण्याचा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाचा लेप लावा. त्यानंतर अक्षता आणि काळे तीळ अर्पण करा, त्यामुळे आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील आणि आतापर्यंत आपल्या हातून घडलेले पापही धुवून निघतील. शिवाय घरातले वाद मिटून शांतता निर्माण होईल.
रस्त्यात पैसे मिळणं म्हणजे लाभ नाही, हा असतो एक मोठा संकेत, दुर्लक्ष कराल तर गमवून बसाल!
शिवलिंगावर करावा पंचामृताचा अभिषेक
महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध, दही, मध, साखर आणि देशी तूप असा पंचामृताचा अभिषेक करावा. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. दरम्यान, यंदा 8 मार्च रोजी महाशिवरात्र आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
