अनेक भाविक बुधवारी गणेश पूजा करतात, दरमहा संकष्टी चतुर्थीचा उपवास ठेवतात. गणेश जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेश जयंती असेही म्हटले जाते. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. श्री गणेश या दिवशी पृथ्वीवर आले होते, गणेशाचा हा अवतार दिन म्हणून साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास आणि उपासनेसह मंत्र जप करणे लाभदायी ठरते आहे. पंडित रमाकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश जयंतीच्या मंत्रांची माहिती जाणून घेऊ.
advertisement
गणेश जयंती तिथी, मुहूर्त, मंत्र -
गणेश जयंतीच्या दिवशी मध्याह्न गणेश पूजा मुहुर्त सकाळी 11.31 ते दुपारी 1:40 पर्यंत असेल. गणेश भक्तांना बाप्पाची उपासना पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 2 मिनिटांचा मिळतील. या व्यतिरिक्त वर्जित चंद्र दर्शनची वेळ रात्री 09.02 ते 09.07 या वेळेत आहे.
वसंत पंचमी ठरणार टर्निंग पॉईंट! शश राजयोगात या राशींचे दिवस फिरणार
गणेश जयंतीला या मंत्रांचा जप करा - गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. नंतर एका पाटावर गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. गणरायाला गंगाजलाने स्नान करा आणि नंतर त्यांना धूप, दिवे, फुले, रोली, दुर्वा, सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा. पूजेमध्ये खालील मंत्रांचा जप अवश्य करावा.
नव्या वाटा शोधाव्या लागणार! फेब्रुवारी महिना या राशींना अनलकी, धनहानीचे संकेत
॥श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥
॥ ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥
॥ ॐ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥
॥ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं में वशमानय स्वाहा॥
वसंत पंचमी ठरणार टर्निंग पॉईंट! शश राजयोगात या राशींचे दिवस फिरणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)