Ganeshotsav 2025 : गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना झाकून का आणली जाते? तुम्हाला माहितीये का कारण?
ज्योतिषी शंकर पाटील सांगतात की, “गर्भवती महिलेचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही. घरामध्ये गर्भवती महिला असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात आणि तिचे पाण्यात विसर्जन करण्यात यावे. चुकीची रुढी परंपरा पुढे नेऊ नये.”
advertisement
या परंपरा फक्त गैरसमजातून...
गणपती उत्सवात अनेक परंपरा पाळल्या जातात. मात्र, काही परंपरा केवळ गैरसमजातून आजतागायत टिकून आहेत. जसं की घरात गर्भवती स्त्री असेल तर विसर्जन करू नये, मूर्ती वर्षभर घरात ठेवावी, नदी-नाल्यात मूर्ती विसर्जन करावी, विसर्जनानंतर पुन्हा दुसरी मूर्ती ठेवावी किंवा दिखाव्यासाठी महागडे दागिने चढवावेत. तज्ज्ञांच्या मते, “या परंपरांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. गणेशोत्सवाचा खरा संदेश भक्ती, साधेपणा आणि निसर्गाशी समतोल साधणं हाच आहे.”
दरम्यान, ज्योतिषतज्ज्ञांच्या मतानुसार, आपण देखील या परंपरांऐवजी शुद्ध भक्तीला महत्त्व द्यावं आणि गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा.