मेष, कर्क, सिंह आणि धनु असेल तर तुमच्यासाठी सोने परिधान करणे चांगले राहील. वृश्चिक आणि मीन राशीसाठी मध्यम आणि वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ राशीसाठी चांगले नाही. तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी कमीत कमी सोने परिधान करावे.
जे लोक लोखंड, कोळसा किंवा शनिशी संबंधित कोणत्याही धातूचा व्यवसाय करत असतील तर त्यांनी सोने घालू नये. असे केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. गरोदर महिला आणि वृद्ध महिलांनीही सोने घालू नये असं जाणकार मंडळी सांगतात.
advertisement
सोनं ऊर्जा आणि उष्णता दोन्ही निर्माण करते आणि ते वाईट परिणाम शरीरातून काढून टाकते. सर्दी किंवा श्वसनाचे आजार असल्यास करंगळीत सोने धारण करावे. जर तुम्हाला आदर आणि सहकार्य हवे असेल तर सोने परिधान करा. जर तुम्हाला एकाग्रता हवी असेल तर तर्जनीमध्ये सोने घाला. वैवाहिक जीवन सुखी करायचे असेल तर गळ्यात सोन्याची साखळी घाला. मूल नसेल तर अनामिकेत सोन्याची अंगठी घाला.
सोने डाव्या हातात घालू नये. जेव्हा विशेष गरज असेल तेव्हाच ते डाव्या हातावर घाला. डाव्या हातात सोने धारण केल्याने त्रास होऊ शकतो. सोन्याच्या जोडव्या किंवा कमरेत सोनं घालू नये कारण सोन्य अत्यंत पवित्र धातू आहे. हा बृहस्पतिचा धातू आहे. माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पायात घालू नये असं म्हटलं जातं.
जर तुम्ही सोनं परिधान करत असाल तर मद्य आणि मांसाहार करू नका. असे केल्याने तुम्हाला समस्यांनी घेरले जाऊ शकते. सोने हा गुरूचा पवित्र धातू आहे आणि त्याची शुद्धता राखणे आवश्यक आहे. झोपताना उशीवर सोने ठेवू नका. बरेच लोक आपली अंगठी किंवा साखळी काढून उशीखाली ठेवतात. यामुळे झोपेची समस्या तर निर्माण होईलच, पण इतर समस्याही उद्भवू शकतात.
