देवघर - देवउठनी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीपासून पुन्हा एकदा लग्नाचे मुहूर्त सुरू होतील. मात्र, असे अनेक तरुण-तरुणी आहेत, ज्यांना लग्न करण्यात अडचणी येतात. अनेकांना चांगले स्थळ मिळत नाहीत. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला कार्तिकी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु योग निद्रेतून उठतात आणि मग तेव्हापासून मंगलकार्यांना सुरुवात होते. त्यामुळे लग्नात जर अडचणी येत असतील तर नेमके काय उपाय करावेत, हे आपण जाणून घेऊयात.
advertisement
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला तिथीला एकादशीचा उपवास केला जाईल. या वर्षी हा उपवास 12 तारखेला केला जाईल. या दिवशी तुळशी विवाहसुद्धा केला जातो.
तिला स्क्रिन समोरून हलता येईना, कपडेही काढायला लावले, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
अनेक तरुण किंवा तरुणींच्या लग्नात अनेक अडचणी येतात. त्यांना चांगले स्थळ मिळत नाही. तसेच विवाहात उशीर होतो. कुंडलीमध्ये मंगळ किंवा शनि दोष असेल तर विवाहास उशीर होतो. मुलासाठी सूर्य बल पाहिले जातो आणि मुलीसाठी गुरू बल पाहिले जाते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता काही उपाय करण्याची गरज आहे.
ज्योतिषाचार्य म्हणाले की, या एकादशीला तुळशी माता आणि भगवान कृष्णाचा विवाह करावा. कारण तुळशी मातेला लक्ष्मी मातेचे रुप मानले गेले आहे. यासोबतच या दिवशी तुळशीवर सोळा श्रृंगार आणि शेंदूर अर्पण करावा. शेंदूर अर्पण केल्यानंतर सर्व क्रूर ग्रह शांत होतील. तसेच विवाह केल्यानंतर 'हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, जे काही अडचणी आहेत ते दूर करा आणि शुभ परिणाम प्रदान करा,' अशी प्रार्थना करावी. विवाहानंतर तुळशीमातेला उसाचा रस दुधात मिसळून अर्पण करावा. असे केल्याने तरुण-तरुणींचे विवाह नक्की निश्चित होतील.
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी, आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.