तिला स्क्रिन समोरून हलता येईना, कपडेही काढायला लावले, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
digital arrest crime news - तिला डिजिटल अरेस्टची शिकार करण्यात आले. तिने 15 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात नंबरवरुन कॉल रीसिव्ह केला. त्या कॉलमध्ये तिला सांगण्यात आल की, तिने थायलंडला पाठवलेले पार्सलमध्ये ड्रग्स आढळले आहेत. दुसऱ्यांदा कॉल केल्यावर तरुणीला धमकी देण्यात आली
अहमदाबाद : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे सायबर क्राइमच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आणि फक्त तिची आर्थिक फसवणुकच झाली नाही तर तिला तिचे कपडे उतरवण्याचीही मागणी करण्यात आली.
काय आहे संपूर्ण घटना -
अहमदाबाद येथे ही घटना घडली. नारायणपुरा पोलिसांनी या टोळीचा भाग असणाऱ्या 12 जणांना अटक केली आहे. त्यांनी या तरुणीचे 4 लाख 91 हजार रुपये चोरले. तसेच त्यांना देशभरात अनेकांची फसवणुक केल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या घटनेमध्ये आर्थिक लूट केल्यावर मुलीच्या शेजाऱ्याने तिला व्हिडिओ कॉल करून तिची फसवणूक झाल्याचे सांगितले.
advertisement
ही तरुणी अहमदाबादच्या नारायणपुरा येथील अंकुर चार रोडच्या जवळ राहते. तिला डिजिटल अरेस्टची शिकार करण्यात आले. तिने 15 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात नंबरवरुन कॉल रीसिव्ह केला. त्या कॉलमध्ये तिला सांगण्यात आल की, तिने थायलंडला पाठवलेले पार्सलमध्ये ड्रग्स आढळले आहेत. दुसऱ्यांदा कॉल केल्यावर तरुणीला धमकी देण्यात आली आणि वेगवेगळ्या एजन्सीची बनावट कागदपत्रे दाखवली गेली. तसेच तक्रारीच्या डिटेल्सची पीडीएफ फाईलही पाठवण्यात आली. त्यानंतर आरबीआयमध्ये पैसे जमा करण्याचे तिला सांगितले आणि तिच्या बँक खात्यातून एकूण 4 लाख 92 हजार रुपयांची चोरी केली. पडताळणीनंतर पैसे परत केले जातील, असे तिला सांगण्यात आले.
advertisement
'जन्माची खूण दाखवण्यासाठी कपडे काढ'
पैशांची लूट केल्यावर तिला आपली जन्माची खूण दाखवण्यासाठी कपडेही काढण्यास सांगितले. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला. तर आरोपीने मुलीच्या शेजाऱ्याला व्हिडिओ कॉल करुन सांगितले की, त्यांनी मुलीला डिजिटल अरेस्ट तिची फसवणूक केली. मुलीची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने नारायणपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवून बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाचा तपशील घेऊन तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडूमधून 12 आरोपींना अटक केली.
advertisement
पोलिसांनी आरोपींकडून 2 लॅपटॉप, 17 मोबाईल, 11 चेकबुक आणि 8 डेबिट कार्ड जप्त केले आहेत. चीनी हँडलर्सनी टेलिग्रामवर वेगवेगळे चॅनेल तयार केले होते. यामध्ये सदस्यांचा समावेश होता. त्यांना लोभस जाहिराती देऊन जास्त कमिशन किंवा जास्त पगाराचे आश्वासन देऊन लोकांकडून बँक खात्याची माहिती घेतली जात होती, असे पोलीस तपासात असे समोर आले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्यावी आणि कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Gujarat
First Published :
November 05, 2024 5:35 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
तिला स्क्रिन समोरून हलता येईना, कपडेही काढायला लावले, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?