तु एकटा ये भेटायला..., तरुणीने हॉटेलमध्ये बोलावलं, लग्नाआधी तरुणाची मोठी फसवणूक, काय घडलं?

Last Updated:

crime news - या तरुणीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या तरुणीने मेहसाणा येथील या तरुणाला एकटाच ये असे सांगत अडालज येथील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. यानंतर तरुण तिला भेटायला गेला.

प्रतिका्त्मक फोटो
प्रतिका्त्मक फोटो
अहमदाबाद - लग्नाचे आमिष देऊन बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसेच प्रियकर प्रेयसीच्या वादाच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडवण्याची धमकी देत लाखो रुपयांची वसूली केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अहमदाबाद येथील गुन्हे शाखेने मेहसाणा येथील 2 जणांना याप्रकरणी अटक केली. यामध्ये एक व्यक्ती हा 54 वर्षांचा असून सारसपुर येथील रहिवासी आहे. तर एक तरुणी 24 वर्षांची असून चांदलोढिया येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी आरोपींनी मॅट्रिमोनियल चालवत असल्याचा दावा करत पीडित व्यक्तीसोबत त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी फोन केला होता आणि त्यांना अनेक तरुणींचे फोटोही पाठवले होते. यापैकी एका तरुणीने तक्रारदार म्हणजे वराच्या आई वडिलांशी संपर्क केला होता.
advertisement
तरुणीने तरुणासोबत बोलण्यासाठी फोन केला होता. तक्रारदार आपल्या मुलासाठी स्थळ शोध होता. या तरुणीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या तरुणीने मेहसाणा येथील या तरुणाला एकटाच ये असे सांगत अडालज येथील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. यानंतर तरुण तिला भेटायला गेला. तेथे दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले. मात्र, शारीरिक संबंध ठेवल्यावर तिने त्या तरुणाला त्यांच्या भेटीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले आणि हा व्हिडिओ त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच जर 2 लाख रुपये नाही दिले तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकेन आणि बलात्काराच्या केसमध्येही फसवेन, अशी धमकी दिली. 2 लाख रुपयांनंतर आरोपींनी 5 लाख रुपयांची मागणी केली.
advertisement
यानंतर या तरुणाने आपल्या आई वडिलांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांनी गांधीनगरच्या अडालज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधाराव कार्यवाही करत अहमदाबादच्या गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली. तसेच त्यांना अडालज पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
तु एकटा ये भेटायला..., तरुणीने हॉटेलमध्ये बोलावलं, लग्नाआधी तरुणाची मोठी फसवणूक, काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement