सकाळी उठल्याबरोबर काही तुटल्या-फुटलेल्या वस्तू पाहू नयेत, विशेषत: तुटलेल्या घड्याळाकडे पाहू नये. घरात असे घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाका. त्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मकता येण्याची शक्यता असते.
अनेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहण्याची सवय असते. परंतु ती सवय धोकादायक ठरू शकते. त्यामुळं सकाळी-सकाळी उठल्यानंतर आरशात पाहणं टाळायला हवं.
सकाळी उठल्यानंतर कुणाची सावली पाहु नका, कारण त्यामुळं आपल्या आयुष्यात संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता येण्याची शक्यता असते.
advertisement
घरातील तुटलेली भांडी आणि खराब फर्निचरमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. सकाळी उठल्यावर अशा गोष्टी पाहू नका. त्यामुळं अशा वस्तूंना आपल्या बेडरूमपासून लांब ठेवायला हवं.
सकाळी उठल्यानंतर अंथरुणातून थेट स्वयंपाकघरात जाऊ नका. कारण सकाळी-सकाळी स्टोव्हला आग लावणं हे अशुभ मानलं जातं. झोपेतून उठल्यानंतर 10-15 मिनिटांनी किचनमध्ये जायला हवं.
स्वयंपाकघरातील अस्वच्छ भांडी सकाळी उठल्यानंतर पाहू नका. आपल्यापैकी बरेच जण रात्रीच्या जेवणानंतर ती भांडी सिंकमध्ये सोडतात. सकाळी उठल्यानंतर ते धुतात. परंतु ते सकाळी उठल्यानंतर आपल्या नजरेस पडणं हे अशुभ मानलं जातं.
फेब्रुवारीमध्ये 4 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन! या 6 राशींचे भाग्य उजळणार
सकाळी आपण जेव्हा स्वयंपाकघरात जातो, तेव्हा चुलीवर असणाऱ्या भांड्यातून आपल्याला वाफ निघताना दिसते. त्याला पाहु नये कारण यात नकारात्मक ऊर्जा असते.
घरातील स्वयंपाकघरातील काही भांडी काळ्या रंगाची असतात. तळताना या भांड्यांना काळे डाग पडतात. अशा भांड्यांना सकाळी सकाळी पाहु नये कारण त्यालाही अशुभ मानलं जातं.
भोपळा खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार भोपळ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर भोपळा पाहू नये.
सकाळी उठल्यावर तलवारी, कात्री, काठ्यासुद्धा पाहू नयेत. यात नकारात्मक ऊर्जा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण त्यामुळं दिवसाची खराब सुरूवात होऊ शकते.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)