TRENDING:

कार्तिकी एकादशीला का करतात व्रत? काय आहेत उपवासाचे लाभ? पाहा Video

Last Updated:

कार्तिकी एकादशीला उपवास करण्यामागं धार्मिक आणि शास्त्रीय कारण असल्याचं योगी निरंजननाथ सांगतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 23 नोव्हेंबर: पंढरीतील श्री विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. आषाढी कार्तिकीला मोठ्या संख्येने वारकरी चंद्रभागेच्या काठी गोळा होत असतात. आज कार्तिकी एकादशीनिमित्त ठिकाठिकाणच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी दिसते. तसेच अनेकजण कार्तिकी एकादशीला उपवास करतात. मात्र, हा उपवास का केला जातो? याबाबत काहींना माहिती नसते. विशेष म्हणजे हा उपवास करण्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणही असल्याचं आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ सांगतात.
advertisement

कार्तिकी एकादशी महत्त्व

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते. प्रबोधिनी एकादशीला देवउठनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. त्यानंतरच सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. या दिवशी अनेकजण भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करतात. या दिवशी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

advertisement

स्वप्नात दिला दृष्टांत अन् उभी राहिली विदर्भातील प्रति पंढरी, त्रिवेणी संगमावरील हे ठिकाण माहितीये का?

का करावा उपवास?

पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि 14 दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते; म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा, असे आहे; परंतु चातुर्मासात एकादशीचे व्रत करावे. एकादशीला ठेवलेला उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. चातुर्मासचा शेवटचा दिवस मानला जातो, असंही योगी निरंजन सांगतात.

advertisement

उपवासाचे लाभ

कार्तिकी एकादशीला अनेक भाविक संपूर्ण दिवसभर उपवास करतात. एकादशीचा उपवास ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला देखील विशेष महत्व दिलं जातं. एकादशीचे लाभ ‘पद्मपुराणा’मध्ये सांगितले आहेत. एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला हरिदिन विष्णूचा दिवस संबोधतात, असंही योगी निरंजन महाराज सांगतात.

advertisement

भगवान विष्णूचा पतिव्रता वृंदाशी विवाह, तुळशीच्या लग्नाची आख्यायिका माहितीये का?

संतांनी आपल्या कामातच विठ्ठल शोधला म्हणून आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधा अशी शिकवण त्यांनी दिली आणि त्यामागचं महत्व पटवून दिलं. या निमित्ताने काही वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरात दाखल होतात. ज्यांना पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होत नाही ते भाविक जवळच्या विठ्ठल मंदिराला जाऊन भेट देतात आणि विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात. कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते.अशी माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिली आहे.

advertisement

कार्तिकी प्रबोधिनी एकादशी: गुरुवार, 23 नोव्हेंबर 2023

कार्तिकी प्रबोधिनी एकादशी प्रारंभ: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 रोजी रात्रौ 11 वाजून 04 मिनिटे.

कार्तिकी प्रबोधिनी एकादशी सांगता: गुरुवार, 23 नोव्हेंबर 2023 रोजी रात्रौ 09 वाजून 02 मिनिटे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
कार्तिकी एकादशीला का करतात व्रत? काय आहेत उपवासाचे लाभ? पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल