भगवान विष्णूचा पतिव्रता वृंदाशी विवाह, तुळशीच्या लग्नाची आख्यायिका माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्याबाबत एक आख्यायिका सांगितले जाते.
वर्धा, 22 नोव्हेंबर: हिंदू पंचागानुसार कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह होत असतो. वनस्पती रुपातील तुळशीचा भगवान श्रीकृष्णाशी विवाह लावला जातो. दरवर्षी द्वादशीला हा सोहळा घरोघरी साजरा होत असतो. परंतु, यामागं काय आख्यायिका आहे ? हे अनेकांना माहिती नसेल. वर्धा येथील नेहा बांगडभट्टी यांनी याबाबतच माहिती दिली आहे.
काय आहे आख्यायिका?
तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याबाबत एक आख्यायिका सांगितले जाते. तुळशी ही भगवान विष्णूंची परमभक्त होती. तर फक्त एका शापामुळे तिचे रूपांतर वनस्पती रूपात झाले. भगवान विष्णूने तिच्या अतूट भक्तीला स्पर्श करून घोषित केले की ते तिच्या वनस्पतीच्या रूपात तिच्याशी विवाह करतील. तेव्हापासून तुळशीचं लग्न लावण्याची परंपरा सुरू झाली, असं बांगडभट्टी सांगतात.
advertisement
तुळशीचा विवाह कृष्णाशीच का लावला जातो?
कृष्ण हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. इंद्राला शाप देण्यासाठी शंकराने आपल्या तिसऱ्या नेत्रातून ज्वाला काढली होती. ती अग्नी कुठे टाकायची म्हणून त्यांनी ती समुद्रात टाकली. त्याच्यातून जालंधर निर्माण झाला. याच जालंधरचा विवाह दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वृंदाशी ठरवला. वृंदा ही भगवान विष्णूची परमभक्त होती. तर जालंधर हा खूप उग्र आणि राक्षसी स्वभावाचा होता. तसेच त्याला पार्वती मिळवायची होती. पण हे शक्य नव्हतं. तेव्हा वृंदानं आपल्या होणाऱ्या पतीला शांत करण्यासाठी एक व्रत ठेवले होते.
advertisement
वृंदानं ठेवलेल्या व्रतातील पूजेला तिच्यासोबत जालंधरनं बसणं गरजेचं होतं. पण युद्धामुळे तो त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. तेव्हा परमभक्त असणाऱ्या वृंदाची परीक्षा घेण्यासाठी विष्णू जालंधरचे रूप घेऊन तिथे गेले. पतिव्रता असणाऱ्या वृंदेने ते जालंधर नसल्याचं ओळखलं. भगवान विष्णूने आपल्या खऱ्या रुपात प्रकट होत तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन आल्याचे सांगितले.
advertisement
वृंदाला मात्र आपली फसवणूक झाल्याचे वाटले आणि क्रोधित होऊन तिने भगवान विष्णूला शाप दिला. त्यामुळे ते तिथे एका दगडाच्याच रुपात शालीग्राममध्ये रुपांतर झाले. तसेच वृंदा स्वत:ही भस्म झाली. त्याच ठिकाणी एक झाड निर्माण झालं ते तुळशीचं झाड आहे. त्यालाच तुळशी वृंदावन म्हणूनही ओळखलं जातं. त्यानंतर विष्णूंनी तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
एवढ्या मोठ्या पतिव्रतेचं व्रत पूर्ण होऊ शकलं नाही. वृंदा एक पतिव्रता असल्यामुळे भगवान विष्णूंनी तिला लक्ष्मी रूपात मानले. तसेच प्रत्येक कार्तिकी पौर्णिमेच्या काळात तुळशीची लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपण विष्णूचा दगडाचा अवतार म्हणजे शालिग्रामध्ये तुळशीचे लग्न करतो. श्रीकृष्ण विष्णूचे अवतार असल्यानं त्यांच्यासोबत विवाह लावला जात असल्याचही बांगडभट्टी सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
November 22, 2023 12:43 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
भगवान विष्णूचा पतिव्रता वृंदाशी विवाह, तुळशीच्या लग्नाची आख्यायिका माहितीये का?