TRENDING:

दररोज लावत आहात टिळा, तर या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा दिवसभरातील पुण्य होणार नष्ट

Last Updated:

टिळा लावण्याची परंपरा ऋषी-मुनींच्या काळापासून आहे. कपाळावर टिळा लावल्याने सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच दिवसभर केलेले पाप हे नष्ट होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परमजीत कुमार, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

देवघर : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्यात करण्याआधी कपाळावर टिळा लावला जातो. ही परंपरा जुनी आहे. तर काही लोक दररोज पूजेदरम्यान, टिळा लावतात. टिळा न लावता पूजा करत नाहीत. कपाळावर टिळा लावल्याने मन शांत आणि एकाग्र असते. शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, असे मानले जाते.

सर्व लोक एकसारखा टिळा लावत नाही. कुणी लांब टिळा लावतो तर कुणी गोल टिळा लावतो. कुणी त्रिपुंड तर कुणी भस्म लावतो. पण टिळा लावण्याचा एक नियम असतो. या नियमाचे पालन केल्याने शुभ फळाची प्राप्ती मिळते. जर नियमानुसार टिळा लावला नाही तर एकाग्रता भंग होऊ शकते. तुम्ही चुकीच्या पद्धतीने टिळा लावला तर तुम्हाला याचा विपरित परिणाम पाहायला मिळतो.

advertisement

तुमच्या राशीतील शनिग्रह होणार मजबूत, पण प्रत्येकाला हे रत्न सूट होत नाही, जाणून घ्या फायदे-तोटे

पाप होतात नष्ट -

देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पं. आनंद किशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, टिळा लावण्याची परंपरा ऋषी-मुनींच्या काळापासून आहे. कपाळावर टिळा लावल्याने सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच दिवसभर केलेले पाप हे नष्ट होते. सर्व संप्रदायाचे लोक विविध प्रकारचा टिळा लावतात. जसे की वैष्णव संप्रदायाचे लोक त्रिपुंड उर्दपुण्ड टिळा लावतात. म्हणजे उभी रेषा असा टिळा लावतात. शैव संप्रदायाचे लोक त्रिपुंड आणि शाक्त संप्रदायाचे लोक लाल चंदन नक्की लावतात.

advertisement

photos : जमिनीपासून 10 हजार फूट उंचीवर आहे हे पोलीस ठाणे, वर्षातून उघडते फक्त 5 महिने, Location काय?

टिळा लावण्याचे नियम -

1. टिळा लावताना डाव्या हाताला डोक्याचे मागे ठेवावे. कारण यावेळी डोक्यात कोणतीही नकारात्मक बाब येऊ नये. तसेच जेव्हा स्वत:ला टिळा लावाल तेव्हा अनामिका किंवा अंगठ्याने लावावा. कारण अंगठ्याचा संबंध हा शुक्राशी आहे. हा धन-वैभव संपदेचा कारक मानला जातो.

advertisement

2. मानवी जीवनावर दिशेचा विशेष प्रभाव आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही टिळा लावाल तेव्हा उत्तर किंवा पूर्व दिशेला उभे राहूनच टिळा लावावा. अन्यथा शुभ फळाची प्राप्ती होणार नाही. जीवनावर अशुभ प्रभाव पडू शकतो.

3. टिळा लावताना एक मंत्र म्हणायला हवा आणि तो मंत्र “ॐ चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपदां हरते नित्यं, लक्ष्मी तिष्ठति सर्वदा” हा आहे.

advertisement

4. टिळा लावल्यानंतर तामसिक भोजन अजिबात करू नये. जर तुम्ही टिळा लावल्यावर तामसिक भोजन केले तर तुमचे दिवसभराचे पुण्य नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यातील त्रास वाढेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
दररोज लावत आहात टिळा, तर या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा दिवसभरातील पुण्य होणार नष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल