ऋषिकेश : ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कर्मानुसार फळ देणारा ग्रह सांगितले गेले आहे. ज्यावरही यांची कृपा होते, त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या समाप्त होतात आणि आयुष्य सुखमय होते. तसे तर शनिदेव लवकर रागवत नाही. मात्र, जर तुमचे कर्म चांगले असतील तर ते तुम्हाला शुभ फळही देतात.
पण जर तरीही एखाद्या गोष्टीमुळे शनिदेव तुमच्यावर नाराज असतील किंवा रागावले असतील किंवा तुमच्या कुंडलीमध्ये शनि दोष वाईट प्रभाव आहे तर नियमानुसार, पूजा केल्याने तो दूर होतात.
advertisement
राष्ट्रपती भवनात तुम्हीही जाऊ शकता, तिकीट फक्त 50 रुपये, फक्त ही आहे छोटीशी प्रोसेस
शनिदेवाला असे प्रसन्न करा -
लोकल18 शी बोलताना पुजारी प्रकाश चंद्र जोशी यांनी सांगितले की, 2024 मध्ये शनिचे कोणतेही राशी परिवर्तन नाही. पण शनिची महादशा कोणत्याही राशीत होऊ शकते. शनिच्या साडेसातीची गणना जातकाच्या जन्म कुंडलीच्या आधारावर ज्ञात होते.
तर ज्योतिष शास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्यांना सोबत ठेवल्याने आणि नियमानुसार शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव लवकरच शुभ फळ देते. शनिदेवाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी या विधीने पूजा करावी आणि शनि यंत्र, लोखंडी रिंग अशा त्यांच्या प्रिय वस्तू आपल्या जवळ ठेवाव्या.
उद्या सीता नवमी, अनेक दुर्लभ योग होतायेत तयार, यावेळी पूजा केली तर मिळेल हवं ते फळ
अशाप्रकारे करा शनिदेवाची पूजा -
पुजारी प्रकाश यांनी सांगितले की, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात आधी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. यानंतर शनि मंदिरात जावे आणि शनि देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. मग पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावावा. 7 वेळा पिंपळाच्या वृक्षाची 7 वेळा परिक्रमा करावी. मग नंतर शनि कवचाचा पाठ करावा आणि शेवटी आरती करावी. शनिवारच्या दिवशी असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील.
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवादानंतर लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दाव करत नाही.