उद्या सीता नवमी, अनेक दुर्लभ योग होतायेत तयार, यावेळी पूजा केली तर मिळेल हवं ते फळ
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
असे म्हटले जाते की, या दिवशी सीता मातेसोबत प्रभू रामाची उपासना केल्याने जीवनात येत असलेल्या अनेक संकटांपासून सुटका होते.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षाच्या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला सीता नवमी साजरी केली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी सीता मातेचा जन्म झाला होता. या दिवशी सीता मातेची विधीनुसार, पूजा आराधना केली जाते.
असे म्हटले जाते की, या दिवशी सीता मातेसोबत प्रभू रामाची उपासना केल्याने जीवनात येत असलेल्या अनेक संकटांपासून सुटका होते. ज्योतिषीय गणनेनुसार, या वर्षी सीता नवमीच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग तयार होत आहे. यामुळे तुम्हाला हवे ते फळ मिळेल.
advertisement
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षाच्या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला सीता नवमीचा सण साजरा केला जातो. नवमी तिथीची सुरुवात यावर्षी 16 मे रोजी सकाली 6:22 वाजता सुरू होऊन 17 मे रोजी सकाळी 8:48 वाजता समाप्त होईल.
राष्ट्रपती भवनात तुम्हीही जाऊ शकता, तिकीट फक्त 50 रुपये, फक्त ही आहे छोटीशी प्रोसेस
उदया तिथीनुसार, सीता नवमीचा सण उद्या 16 मे रोजी साजरा केला जाईल. या दिवसाचे शुभ मुहूर्त सकाळी 10:56 वाजेपासून दुपारी 1:39 वाजेपर्यंत राहील. या वर्षी सीता नवमीच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग तयार होणार आहेत. या दिवशी शिववास योग तयार होणार आहे. या दिवशी सीता मातेची पूजा केल्याने जातकाला अक्षय फळाची प्राप्ती होते.
advertisement
यासोबतच सीता नवमीला रवि योग तयार होत आहे. रवि योग 6:14 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 5:29 वाजेपर्यंत राहील. तसेच ध्रुव योग आणि बालव करण योगही तयार होत आहे. या योगात पुजा केल्याने मनासारखं फळ मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवादानंतर लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दाव करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
May 15, 2024 12:45 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
उद्या सीता नवमी, अनेक दुर्लभ योग होतायेत तयार, यावेळी पूजा केली तर मिळेल हवं ते फळ