Hero ने लाँच केली दमदार Scooter, मायलेज 56 किमी, किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वाधिक दुचाकी आणि बाईक उत्पादक कंपनी हिरोनं आता आपली नवी स्कुटर लाँच केली आहे.
भारतातील सर्वाधिक दुचाकी आणि बाईक उत्पादक कंपनी हिरोनं आता आपली नवी स्कुटर लाँच केली आहे. हिरोने आपली Hero Destini 110 स्कुटर दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. VX कास्ट ड्रम आणि ZX कास्ट डिस्क प्रकारात लाँच केली आहे. निओ-रेट्रो स्टाइलिंग, क्लास-लीडिंग मायलेज, सेगमेंट-सर्वात लांब सीट आणि आरामदायी फिचर्ससह Hero Destini 110 कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून लाँच केली आहे.
अपडेट केलेल्या मॉडेलमध्ये प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, क्रोम अॅक्सेंट आणि एच-आकाराचे एलईडी टेललॅम्प आहेत. विशेष म्हणजे, नवीन Hero Destini 110 त्याच्या सेगमेंटमधील सर्वात लांब सीट दिलं आहे, ज्याची लांबी ७८५ मिमी आहे. यात १२-इंच फ्रंट आणि रियर व्हील्स आहेत, ज्यामध्ये ९०/९० फ्रंट आणि १००/८० रियर टायर्स आहेत. स्कूटरमध्ये रायडरसाठी भरपूर लेगरूम आहे तसंच ग्लोव्ह बॉक्स, बूट लॅम्प, डिस्क ब्रेक आणि अॅनालॉग-डिजिटल स्पीडोमीटर सारख्या फिचर्सचा समावेश आहे.
advertisement
किंमत किती?
Hero Destini 110 मध्ये दोन व्हेरिएंट आहेत. VX कास्ट ड्रम ७२,००० तर ZX कास्ट डिस्क ७९,००० रुपये किंमत एक्स शोरूम दिल्ली इतकी आहे. यामध्ये तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मॅट स्टील ग्रे, इटरनल व्हाइट आणि नेक्सस ब्लू, तर झेडएक्स ट्रिम ग्रूव्ही रेड, नेक्सस ब्लू आणि अॅक्वा ग्रे शेड्समध्ये उपलब्ध आहे. या बाइकचं इंजिन ११०.९ सीसी पॉवर ८.७ बीएचपी @ ७,२५० आरपीएम टॉर्क ८.८७ एनएम @ ५,७५० आरपीएम मायलेज ५६.२६ किमी प्रतिलिटर गियरबॉक्स सीव्हीटी स्टार्टिंग सिस्टम इलेक्ट्रिक आणि किक स्टार्ट आहे.
advertisement
पॉवर आणि परफॉर्मन्स
Hero Destini 110 मध्ये ११०.९ सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड एसआय इंजिन वापरलं आहे, जे जास्तीत जास्त ८.०७ बीएचपी पॉवर आणि ८.८७ एनएम टॉर्क जनरेट करते. यात इलेक्ट्रिक आणि किक स्टार्ट सिस्टम आहे. ट्रान्समिशन सीव्हीटी आहे. हिरोच्या i3S (आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम) ने सुसज्ज, अपडेटेड Hero Destini 110 चं ५६.२६ किमी प्रति लिटर मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. Hero Destini 110 च्या सस्पेंशन सेटअपमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक युनिट समाविष्ट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 11:49 PM IST