भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस हे फक्त एक रोपटं नसून, तुळस (Basil) आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ असतं. यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं, असं मानलं जातं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी. तुळशीला दररोज पाणी घालावं. ती सुकली असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं. सुकलेली तुळस घरात ठेवू नये, असं म्हणतात.
advertisement
Palmistry : तळहातावर असेल हा चिन्ह, तर तुम्ही आहात खूप लकी; व्हाल श्रीमंत
घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचं झाड असावं, असं म्हटलं जातं. तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला (Direction) तुळस ठेवावी. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये, असं म्हणतात. तसंच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये, असं म्हटलं जातं. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं. त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवावी.
तुळस घरामधले सगळे दोष दूर करते. तसंच तुळशीमुळे परिवाराचं आरोग्यही चांगलं राहतं. तुळशीचे अनेक फायदे (Importance Of Tulsi) आहेत. कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे. सर्दी-खोकला पळवण्यासाठीही तुळशीचा वापर केला जातो.
भाजी स्वादिष्ट, पानंही गुणकारी; अशक्तपणावर रामबाण!
कोरोना झाल्यावरही तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देण्यात आला. याचबरोबर तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे, हे पाहा आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल, तर आताच जागा बदला.