पितृपंधरवड्यात पूर्वज, पितर पितृलोकातून मृत्युलोकात येतात, असं म्हटलं जातं. या वेळी पितरांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केलं जातं. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपंधरवडा सुरू होतो आणि भाद्रपद अमावास्येला समाप्त होतो. अमावास्येला पितर पितृलोकात परत जातात. त्यामुळे या अमावास्येला पितृमोक्ष अमावास्या, सर्वपित्री अमावास्या किंवा महालया असं म्हटलं जातं.
advertisement
यंदा 18 सप्टेंबरपासून पितृपंधरवडा सुरू होत असून, तो 2 ऑक्टोबरला संपेल. पितृपक्षाची सुरुवात आणि समाप्ती अशा दोन्ही दिवशी ग्रहण असेल. हिंदू धर्मात ग्रहण शुभ मानलं जात नाही. सूर्य आणि चंद्रग्रहणात कोणतंही शुभकार्य, पूजा-विधी केला जात नाही.
ज्योतिषाचार्यांच्या मते, एकाच पंधरवड्यात चंद्र आणि सूर्यग्रहण असणं शुभ नसतं. या कालावधीत सावधगिरी बाळगावी. पितृपक्षावर ग्रहणाचं सावट शुभ मानलं जात नाही.
पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने होत आहे. 18 सप्टेंबरला प्रथम श्राद्धाला चंद्रग्रहण आहे. हे वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असेल. भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी चंद्र ग्रहण सुरू होईल आणि सकाळी दहा वाजून 17 मिनिटांनी संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक पाळण्याची गरज नाही. पहिल्या दिवसाचं श्राद्ध ग्रहणाचा मोक्ष कालावधी संपल्यावर करावं.
कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीची मूर्ती? वाचा सविस्तर नाहीतर होईल खूप मोठं नुकसान
पितृपंधरवड्याची समाप्तीदेखील ग्रहणाने होत आहे. दोन ऑक्टोबर रोजी पंधरवड्यातल्या शेवटच्या श्राद्धाच्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण असणं शुभ मानलं जात नाही. कारण या दिवशी पितरांना निरोप दिला जातो. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दोन ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी ग्रहण सुरू होणार असून, मध्यरात्री तीन वाजून 17 मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचा सुतक काळ पाळायची गरज नाही. अमावास्येला पितरांना निरोप देण्यासाठी केलं जाणारे श्राद्ध, तर्पण किंवा अनुष्ठानात या ग्रहणामुळे व्यत्यय येणार नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)