धनप्राप्तीसाठी शुक्रवारी हे उपाय केल्यास लाभते लक्ष्मीमातेची लाभते कृपादृष्टी: आर्थिक समस्या होतील दूर

Last Updated:

लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिला कमळाचं फूल अर्पण करावं. यामुळे धनलाभ होऊ शकतो. तसंच आर्थिक समस्या सुटू शकतात.

News18
News18
जीवनात भरपूर यश, पैसा आणि संपत्ती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते; पण प्रत्येकाला या गोष्टी मिळतातच असं नाही. धनप्राप्तीसाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. लक्ष्मीमाता म्हणजे धनाची देवता मानली जाते. कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी लक्ष्मीमातेची विधिवत पूजा करावी. शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी धनप्राप्तीकरिता कोणते उपाय करता येतात, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील तर त्या सुटण्यासाठी लक्ष्मीमातेची आराधना करावी. यासाठी शुक्रवारी मनोभावे लक्ष्मीपूजन करावं. शुक्रवारचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. हा ग्रह धन आणि प्रेमाचा कारक आहे. या दिवशी तुम्ही काही खास उपाय करू शकता. यामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होते. तसंच शुक्र ग्रहदेखील मजबूत होतो.
कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीची मूर्ती? वाचा सविस्तर नाहीतर होईल खूप मोठं नुकसान
शुक्रवारी लक्ष्मीमातेच्या मंदिरात शंख, कवड्या, कमळ, मखाना आणि बत्तासे अर्पण करावेत. यामुळे धनलाभ होऊ शकतो. ज्या घरात स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीमाता वास करते असं मानलं जातं. त्यामुळे दर शुक्रवारी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. दारासमोर गंगाजल शिंपडावं. तसंच दरवाज्यावर शुभ-लाभ आणि स्वस्तिक काढावं.
advertisement
शुक्रवारी तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन गरीब, गरजूंना वस्त्रदान करू शकता. यामुळेदेखील लक्ष्मीमाता प्रसन्न होते. शुक्रवारी सकाळी गायीला चपाती खायला द्यावी. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिची कृपादृष्टी कायम राहते. सायंकाळची वेळ ही लक्ष्मीमाता येण्याची वेळ असते. या वेळी घरातले सर्व दिवे सुरू ठेवावेत. कर्जमुक्तीसाठी शुक्रवारी पिवळ्या कापड्यात पाच कवड्या आणि एक चांदीचं नाणं बांधून ते तिजोरीत ठेवावं. यामुळे धनाचं आगमन होऊ लागतं आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळते.
advertisement
Ganesh Chaturthi 2024: अष्टविनायकाच्या 8 गणपतींचा हा आहे इतिहास! तुम्हाला माहिती आहे का?
लक्ष्मीमातेला कमळाचं फूल प्रिय आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी स्नान केल्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिला कमळाचं फूल अर्पण करावं. यामुळे धनलाभ होऊ शकतो. तसंच आर्थिक समस्या सुटू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
धनप्राप्तीसाठी शुक्रवारी हे उपाय केल्यास लाभते लक्ष्मीमातेची लाभते कृपादृष्टी: आर्थिक समस्या होतील दूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement