कौटुंबिक वादांवर उपाय - वास्तुशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवलिंग ठेवून योग्य विधीपूर्वक रुद्राभिषेक केल्यानं घरातील वास्तुदोष दूर होतात, त्याचबरोबर सुख-समृद्धी प्राप्त होते आणि कुटुंबावर आशीर्वाद नेहमीच राहतात. यामुळे घरात सुरू असलेला वाद संपतो आणि कुटुंबातील लोकांमध्ये सुसंवाद राहतो.
प्रेम आणि सुसंवाद वाढवण्यासाठी - कुटुंबात प्रेम आणि सौहार्द वाढविण्यासाठी, महाशिवरात्रीच्या दिवशी विधीनुसार अभिषेक केल्यानंतर घरात शिव कुटुंबाची मूर्ती/फोटो स्थापित करावा. असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्यानं कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होतोच, शिवाय पती-पत्नीमधील नात्यात गोडवाही वाढतो. शिव कुटुंबाची (माता पार्वती, भगवान शिव, कार्तिकेय आणि गणेश) मूर्ती स्थापित करा.
advertisement
पारद शिवलिंगाची स्थापना - शिव पुराणानुसार, शिवरात्रीच्या दिवशी पूर्ण विधी आणि संस्कारांनी पारद शिवलिंगाची स्थापना केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. प्रतिष्ठापना झाल्यानंतर शिवलिंगावर नियमितपणे शमीची पाने अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व सुखे आणि आनंद मिळतात.
वृश्चिक राशीच्या लोकांना एकच मोलाचा सल्ला! सगळ्यावर कामावर त्यामुळे पाणी फिरतं
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी - आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपंचाक्षरी मंत्राचा योग्यरित्या जप करून आणि रुद्राभिषेक योग्यरित्या केल्याने तसेच महादेवाला 108 बेलाची पाने अर्पण केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते.
रामायण वाचून वास्तुदोष दूर - महाशिवरात्रीच्या दिवशी रामायणाचे पठण केल्याने घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. या शुभ दिवशी रामायणाचे पठण केल्याने भक्तांना शिवच नव्हे तर भगवान श्री राम यांचेही आशीर्वाद मिळतात. रामायणात असे नमूद आहे की, श्रीराम भगवान शिव यांना आपले आराध्य दैवत मानतात.
महाशिवरात्रीला धनिष्ठा नक्षत्रात चंद्र! या राशींना अत्यंत लाभदायी; छप्परफाड कमाई
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)