TRENDING:

Myth Vs Fact : जेवताना ताटाभोवती पाणी का फिरवतात? यामागचं खरं कारण 99 टक्के लोकांना माहितच नाही

Last Updated:

आजच्या घाईघाईच्या जगात आपण ही कृती केवळ एक 'विधी' म्हणून करतो, पण तुम्हाला माहीत आहे का? या साध्या वाटणाऱ्या सवयीमागे केवळ अध्यात्मच नाही, तर त्या काळातील एक अतिशय महत्त्वाचं शास्त्रीय कारणही दडलेलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये जेवणाशी संबंधित अनेक परंपरा आहेत ज्या आपण पिढ्यानपिढ्या पाळत आलो आहोत. आपल्यापैकी अनेकांनी बालपणापासून एक दृश्य नक्कीच पाहिलं असेल. जेवणाचं ताट समोर आलं की, घरातील मोठी माणसं हातावर थोडं पाणी घेऊन ताटाभोवती गोल वेढा घालतात. खासकरुन उपवास सोडताना बहुतांश लोक ही पद्धत अवलंबतात. याला आपण 'चित्राहूती' किंवा 'प्राणाहूती' असं म्हणतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

आजच्या घाईघाईच्या जगात आपण ही कृती केवळ एक 'विधी' म्हणून करतो, पण तुम्हाला माहीत आहे का? या साध्या वाटणाऱ्या सवयीमागे केवळ अध्यात्मच नाही, तर त्या काळातील एक अतिशय महत्त्वाचं शास्त्रीय कारणही दडलेलं होतं.

कीटक आणि धुळीपासून अन्नाचे संरक्षण

जुन्या काळी जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत होती. घरे प्रामुख्याने मातीची असायची, अशावेळी जमिनीवर बसून जेवताना मुंग्या, छोटे कीटक किंवा जमिनीवर रेंगाळणारे जंतू ताटापर्यंत पोहोचण्याची शक्यता असायची. जेव्हा ताटाभोवती पाण्याचा गोल वेढा (मंडल) घातला जायचा, तेव्हा पाणी एक प्रकारच्या 'बॅरियर'चे काम करायचे. मुंग्या किंवा छोटे कीटक पाणी ओलांडून ताटात जाऊ शकत नव्हते. त्यामुळे अन्न स्वच्छ आणि सुरक्षित राहायचे.

advertisement

अन्नाला आपल्याकडे 'पूर्णब्रह्म' मानलं जातं. जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखवणं ही अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे.

अन्नाचा पहिला घास घेण्यापूर्वी ते देवाला अर्पण करणं, ही मनाला शांत करणारी कृती आहे. यामुळे आपण अन्नाचे महत्त्व जाणतो आणि अन्नाचा अपमान (नासाडी) करण्यापासून दूर राहतो.

मंत्रोच्चार करून ताटाभोवती पाणी फिरवल्याने भोवतालचे वातावरण सकारात्मक होते आणि आपण शांत चित्ताने जेवण करतो, ज्याचा पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो.

advertisement

प्राणाहूती: शरीरातील उर्जेचे स्वागत

शास्त्रांनुसार, ताटाभोवती पाणी फिरवल्यानंतर पाण्याचे काही थेंब उजव्या हाताच्या तळव्यावरून पिऊन मगच जेवणाला सुरुवात केली जाते. याला 'आचमन' म्हणतात.

यामुळे घसा ओला होतो आणि अन्नाचा घास सहजपणे खाली उतरण्यास मदत होते. म्हणजेच पाणी प्यायल्यामुळे जेवण कोरड्या घशात अडकत नाही.

शरीरातील पाच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान) यांना तृप्त करण्यासाठी ही एक प्रतीकात्मक सुरुवात मानली जाते.

advertisement

आजच्या काळात याचे महत्त्व काय?

आज आपण टेबलवर जेवतो, घरात टाइल्स आहेत आणि कीटकांचा प्रादुर्भावही कमी आहे. तरीही ही परंपरा पाळणे म्हणजे आपल्या मुळांशी जोडलेले राहणे आहे. जेवणापूर्वी शांतपणे ताटाभोवती पाणी फिरवणे आपल्याला त्या क्षणी 'वर्तमान काळात' आणते आणि अन्नाचा आदर करायला शिकवते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

ताटाभोवती पाणी फिरवणं ही केवळ अंधश्रद्धा नसून ती आरोग्य, स्वच्छता आणि संस्कार यांची एक सुंदर सांगड आहे. विज्ञानाने प्रगती केली असली तरी, आपल्या पूर्वजांनी लावलेले हे छोटे नियम आजही आपल्याला शिस्त आणि कृतज्ञतेचा धडा देतात.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Myth Vs Fact : जेवताना ताटाभोवती पाणी का फिरवतात? यामागचं खरं कारण 99 टक्के लोकांना माहितच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल