बंगालचे कलाकार घडवतात मूर्ती
नागपुरात पश्चिम बंगालमधील कलाकार नवरात्री उत्सवासाठी देवीची मूर्ती घडवतात. सध्या हे मूर्तिकार आपल्या कामात तल्लीन असून दुर्गा मुर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून हे कलाकार कलकत्त्यावरून नागपुरात येतात आणि खास दुर्गा मूर्ती तयार करतात, असे मूर्तिकार सुहास पाल सांगतात. विशेष म्हणजे या मूर्ती म्हणजे पारंपरिक बंगाली मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात.
advertisement
मांसाहारी नैवेद्य न चालणारे काली मातेचे एकमेव रूप; देवीच्या नावाने ओळखला जातो ‘हा’ परिसर Video
गंगा नदीची माती
बंगाली कलाकार या मूर्ती घडवण्यासाठी पूर्णतः पारंपारिक पद्धतीचा करतात. बंगाल मधून वाहणाऱ्या गंगा नदीच्या मातीचा उपयोग केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गंगा नदीतील गाळ काढून तो ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून नागपूरला पाठवण्यात येतो. किरकोळ साहित्य वगळता देवीच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य आम्ही कलकत्ता वरून आणत असतो, असे पाल यांनी सांगितले.
कशी बनते मूर्ती?
मूर्ती तयार करत असताना सर्वप्रथम स्ट्रक्चर बनवले जाते. ज्यामध्ये बांबू, बल्ली, तणस तार, रस्सी आदीचा वापर केला जातो. नंतर मातीने आकार देत ही मूर्ती घडवली जाते. या मूर्तीच्या निर्मितीमध्ये मुख्यतः सजावट ही फार आकर्षणाचा भाग असतो. यातील सजावटीचे साहित्य गोल्डन, सिल्वर आणि सुला लाकडाचा साज असतो. हे सर्व साहित्य आम्ही कलकत्ता वरून खास तयार करून आणत असतो, अशी माहिती सुहास यांनी दिली
परशुरामाला डोंगरावर झाले मातेचे दर्शन; पाहा काय आहे रेणुकादेवीची आख्यायिका Video
नवरात्रीच्या चार महिने कामाला सुरुवात
नवरात्रीच्या चार महिने आधी आम्ही बंगाल वरून नागपुरात येत असतो. या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही गणपती, दुर्गादेवी, काली, विश्वकर्मा, सरस्वती आदींसारख्या असंख्य मूर्ती तयार करतो. नंतर दिवाळीमध्ये आपल्या गावी परत निघून जात असतो. आम्ही गेले 27 वर्षांपासून या मूर्तींचा व्यवसाय करत आहोत. नागपुरातील बंगाली समाज बांधवांच्या वतीने या मूर्तींना मोठी मागणी सुरुवातीच्या काळात होती. आता या मूर्तींना नागपूर विदर्भसह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड सारख्या जिल्ह्यांमधून देखील मोठी मागणी आहे, असे पाल सांगतात.
पारंपरिक कला आणि कौशल्याचा संगम
या मूर्ती तयार करण्याची कला वंशपरंपरागत आमच्याकडे आली. मूर्ती तयार करण्यासाठी पूर्णतः पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला जातो. बंगाली मूर्ती तयार करणं हे मोठ्या कौशल्याचं आणि कलाकुसरीचे काम आहे. मात्र आम्ही तयार केलेल्या मूर्ती अनेकांना आवडत असल्याने आम्हाला फार समाधान आहे, अशी भावना बंगाली कलाकार सुहास पाल यांनी व्यक्त केली.