TRENDING:

दिवाळीत साजरी करतात नवरात्री, 61 वर्षांची परंपरा, मुंबईतील हे ठिकाण नेमकं कोणतं?

Last Updated:

navratri in diwali mumbai - मुंबईतील एक ठिकाण असे आहे, जिथे दिवाळीत हा नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. नेमकं हे ठिकाण कुठे आहे, यामागची परंपरा काय आहे, हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
advertisement

मुंबई - नवरात्रीनंतर आता दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्री हा उत्सव अश्विन महिन्यात व काही ठिकाणी चैत्र महिन्यात साजरा केला जातो. पण मुंबईतील एक ठिकाण असे आहे, जिथे दिवाळीत हा नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. नेमकं हे ठिकाण कुठे आहे, यामागची परंपरा काय आहे, हे जाणून घेऊयात.

advertisement

मुंबईत शिवडी येथे दिवाळीत 9 दिवस नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. गेल्या 61 वर्षापासून ऐन दिवाळी सार्वजनिकरित्या श्री महालक्ष्मीची स्थापना करुन मंडळाच्या वतीने लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. या मंडळाने सुरुवातीच्या काळात छोटीशी मूर्ती आणून महालक्ष्मीची पूजा केली. पुढे तेथील उत्साही तरुण मुलांनी महालक्ष्मीची मोठी मूर्ती आणून देवीची स्थापना केली.

दिवाळी पाडव्याला पतीला पत्नी का ओवाळते?, जाणून घ्या, यामागचं कारण..

advertisement

शिवडीचे श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळ हे दरवर्षी धनत्रयोदशीला या लक्ष्मीची स्थापना करतात आणि नवव्या दिवशी या देवीचे दादर चौपाटीवर विसर्जन केले जाते. लक्ष्मीपूजनाला रात्रभर जागून देवीचा गोंधळ सुद्धा घातला जातो. आठव्या दिवशी याठिकाणी सत्यनारायणाची पूजा सुद्धा घातली जाते.

देवीला रोज पहाटे सहा वाजता व सायंकाळी चार वाजता नवीन साडी नेसविली जाते. यामध्ये दोन सहावार साड्या देवीला नेसविल्या जातात. जसजसे मंडळ आर्थिकदृष्ट्या सबळ होत आहे, तसतसे देवीला दागिने बनविले जात आहेत. देवीचे कानातले, रथ, बांगड्या, मंगळसूत्र हे सर्व सोन्याचे आहे. भक्तांनी मागणे पूर्ण झाल्यावर देवीला ते स्वतः काही दागिने अर्पण करतात. तर मग तुम्हीसुद्धा या दिवाळीतील शिवडीच्या महालक्ष्मीचे दर्शन नक्की घेऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
दिवाळीत साजरी करतात नवरात्री, 61 वर्षांची परंपरा, मुंबईतील हे ठिकाण नेमकं कोणतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल