ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह योगांचा विचार करता या नक्षत्रात चांगला पाऊस होण्याची चिन्हे आहेत. विदर्भ-मराठवाडा, मध्य, पश्चिम महाराष्ट्रात या नक्षत्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकणात तुलनेने पावसाचे प्रमाण कमी राहील. दिनांक 5 ते 8 आणि 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रथा आणि परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यातील वेगवेगळ्या नक्षत्रांचा अंदाज हा परंपरेनुसार बांधला जातो. विशिष्ट नक्षत्राला सुरू होणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, सुनेचा पाऊस तसंच सासूचा पाऊस असं म्हंटलं जातं.
advertisement
या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात
गुरुवार 03 ऑगस्ट रोजी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आसळकाचा पाऊस’, असे म्हणतात. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांनी या पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसांना गमतीशीर नावं ठेवली आहेत. पुनर्वसु नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात. पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ असं म्हंटलं जातं. आश्लेषा नक्षत्रातील पावसाचं ‘आसळकाचा पाऊस’ तर मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो. म्हणून मघा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात, अशी माहिती ज्येष्ठ पंचागतज्ज्ञ दा.कृ सोमण यांनी दिली. महाराष्ट्रील बहुतांश ग्रामीण भागात नक्षत्र आणि वाहनावरून पाऊस कसा पडला किंवा पडेल याविषयी लोक चर्चा करतात.
राज्यात बहुतांश ठिकाणी अपेक्षित पाऊस झाल्याने दुबार पेरण्यांवरील संकट टळले. पेरणी झालेल्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील काही भागात अजूनही शेतीसाठी हवा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नक्षत्र बदलणार असून आसळकाचा पाऊस सुरू होणार असून वाहन म्हैस आहे, या नक्षत्राकडून शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)