उदयपूर, 16 ऑक्टोबर : रविवारी शारदीय नवरात्रोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. विविध सार्वजनिक मंडळांनी देवीची विधीवत प्रतिष्ठापना केली. तर अनेकांच्या घरीदेखील देवी विराजमान झाली. नवरात्रीच्या दिवसांत दुर्गेच्या विविध प्राचीन मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.
राजस्थानच्या मेवाड भागात असलेल्या एका मंदिरातील देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. ही देवी प्रामुख्याने अग्निस्नानासाठी ओळखली जाते. उदयपूर जिल्ह्याच्या बम्बोरा गावात ईडाणा देवीची भव्य मूर्ती आहे. या मूर्तीचं अग्निस्नान पाहण्याचं भाग्य ज्या व्यक्तीला मिळतं तिला नशीबवान मानलं जातं. शिवाय लकवा म्हणजेच पॅरालिसीसने ग्रस्त असलेला रुग्ण या मंदिरातून बरा होऊन परततो, असंदेखील म्हटलं जातं.
advertisement
दांडिया खेळा पण हृदय सांभाळा! ही चूक पोहोचवू शकते मृत्यूच्या दारात
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पॅरालिसीस झालेली व्यक्ती देवीच्या दर्शनाला आल्यास ती पूर्ण बरी होऊन माघारी जाते. जेव्हा देवी प्रसन्न होते तेव्हा तिच्याभोवती आगीचा भडका उडतो. या अद्भुत अशा अग्निस्नानासाठी मंदिर प्रसिद्ध आहे. राजा-महाराजे ईडाणा देवीची पूजा करायचे, असं गावकरी सांगतात. तर, आज सर्वधर्मीय लोक देवीच्या दर्शनाला येतात. मंदिरात पुजारी नाहीत, तर भाविकच मनोभावे देवीची सेवा करतात.
3 राशींच्या साडेसातीची सुरुवात, पण कुंडली दोष होतील दूर! जाणून घ्या काय आहे मान्यता
उदयपूर शहरापासून 60 किलोमीटर दूर कुराबड-बम्बोरा मार्गावर असलेल्या या मंदिराला मेवाडचं प्रमुख शक्तीपीठ मानलं जातं. विशेष म्हणजे हे मंदिर खुल्या जागेत आहेत, त्यावर कोणतंही छप्पर नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक कराhttps://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g