advertisement

दांडिया खेळा पण हृदय सांभाळा! ही चूक पोहोचवू शकते मृत्यूच्या दारात

Last Updated:

नवरात्री उत्सवाच्या काळात अनेकजण दांडिया गरबा खेळत असतात. मात्र हे खेळताना योग्य काळजी घेण्याची गरज असते.

+
दांडिया

दांडिया खेळा पण हृदय सांभाळा! ही चूक पोहोचवू शकते मृत्यूच्या दारात

पुणे, 16 ऑक्टोबर: नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून या काळात सर्वत्र भक्तीमय वातावरण असतं. महिला वर्ग एकत्र येत मोठ्या उत्साहात गरबा, दांडिया खेळत असतो. परंतु, हे खेळत असताना आपल्या स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं असत. म्हणजे आपण अनेक वेळा पाहिलं किंवा ऐकलंल असत की दांडिया खेळताना हृदय विकाराचा झटका आला. तर हे असं का होतं? याच नेमक कारण काय? हे होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? या विषयी पुण्यातील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. निखील राऊत यांनी माहिती दिलीय.
डॉक्टरांचा सल्ला गरजेचा
मागील काही वर्षात आपण असं पाहिलंय की, गरबा दांडिया खेळताना बऱ्याच लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. जे लोक तासनतास गरबा खेळतात आणि त्याची त्यांच्या शरीराला सवय नसते. आपण जिम जॉईन करतो तेव्हा आधी आपण वोर्मअप करतो. आपला व्यायाम वाढवतो. त्याच प्रकारे आपल्याला गरबा खेळताना सुरुवातीला काही त्रास होत नाही ना हे जाणून घेणं महत्वाचं आहे. पण काही झाल्यास तिथेच थांबून डॉक्टराचा सल्ला घेणंही गरजेचं आहे, असं डॉ. राऊत सांगतात.
advertisement
गरबा खेळताना ही घ्या काळजी
गरबा खेळताना आपल्या शरीरातून घामावाटे भरपूर प्रमाणात पाणी निघून जाते. त्यामुळे डीहायड्रेशन होते. खूप जेवण करून देखील गरबा खेळण टाळलं पाहिजे. हलक अन्न घेऊन आपण गरबा नक्कीच खेळू शकतो. शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हृदय विकार असलेल्या लोकांनी डॉक्टराच्या सल्ल्यानेच गरबा खेळायला हवा. त्यातून काही त्रास झाल्यास छातीत दुखणं, दम लागण, घाम येणं, चक्कर येत असेल तर तिथेच थांबून डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे काळजी घेऊन गरबा खेळू शकता, असं डॉ. निखिल सांगतात.
advertisement
दरम्यान, सणासुदीच्या काळामध्ये प्रत्येक माणूस हा उत्साहात आणि जोशात जल्लोषात सण साजरे करत असतो. परंतु हे करत असताना आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आपल्याला कुठल्यालाही गंभीर गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. यासाठी हृदय सांभाळणं अत्यंत आवश्यतक असतं.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
दांडिया खेळा पण हृदय सांभाळा! ही चूक पोहोचवू शकते मृत्यूच्या दारात
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement