प्रत्येकाची आपली स्वत:ची एक उभ रहाण्याची स्टाइल असते. यात बहुतांश लोक आपल्या पॅन्टच्या खिशात आपले हात ठेवून उभे रहातात आणि त्यांची स्टाइल असते. तुमचं पण व्यक्तीमत्व असंच आहे का? किंवा तुम्ही ज्याला ओळखता त्याचीही अशीच सवय आहे का? मग लोकांची अशी बॉडीलॅग्वेज काय सिग्नल देते तुम्हाला माहितीय?
1. आत्मविश्वासाची कमी दर्शवते
advertisement
वारंवार दोन्ही हात खिशात घालून उभं राहणं, हे कधी कधी आत्मविश्वासाच्या कमतरतेचं चिन्ह असू शकतं. एखाद्या गर्दीत किंवा संभाषणादरम्यान हात लपवणं म्हणजे असे लोक पूर्णपणे सहज नाही आहात किंवा स्वतःला व्यक्त करण्यापासून दूर राहता असं हे भासवतं.
2. भावना दडपून ठेवण्याची सवय
हात खिशात घालण्यामागे एक कारण हे देखील असू शकतं की असे लोक त्यांच्या भावना इतरांपुढे व्यक्त करू इच्छित नाही. अशा प्रकारचे लोक बहुतेक वेळा मनातलं स्वतःपुरतंच ठेवतात आणि फक्त गरजेपुरतंच बोलतात. ही सवय माणसाचं व्यक्तिमत्त्व गूढ आणि गोपनीय दाखवते.
3. रिलॅक्स आणि कूल स्वभाव
प्रत्येक वेळी या स्टाइलचा नकारात्मक अर्थ असेलच असं नाही. काहीजण सहजपणे चालताना किंवा थांबलेले असताना हात खिशात घालतात, कारण त्यांना गोष्टींना हलक्याफुलक्या पद्धतीने घ्यायला आवडतं. अशा लोकांचा स्वभाव निवांत, कूल आणि रिलॅक्स असतो.
4. बचावात्मक स्वभाव
कधी कधी हात खिशात घालणं हे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही दर्शवतं. समोरची परिस्थिती अनुकूल नसेल किंवा तुम्ही एखाद्यापासून अंतर ठेवू इच्छित असाल, तर ही बॉडी लँग्वेज समोर येते. यातून हे दिसून येतं की तुम्ही पूर्णपणे ओपन अप व्हायला तयार नाही.
5. स्टाइल आणि अॅटिट्यूड
आजच्या काळात हात खिशात घालून चालणं हे एक फॅशन स्टेटमेंटही बनलं आहे. विशेषत: तरुणांमध्ये हा ट्रेंड आत्मविश्वास आणि अॅटिट्यूड दाखवण्यासाठी वापरला जातो. हे लोक स्वतःला स्टायलिश आणि मॉडर्न दाखवू इच्छितात त्यामुळे ते असा आपला हात खिशात घालून उभे रहातात.
तुम्हाला ही सवय आहे का? पुढच्या वेळी हात खिशात घालताना हे लक्षात ठेवा, तुमची ही छोटीशी कृती तुमचं व्यक्तिमत्त्व कसं दर्शवते ते समोरच्याला नकळत जाणवत असतं.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)