भद्राकाळ नेमका कधी आहे?
जरी यावर्षी रक्षाबंधन दिवशी भद्राकाळ येत असला, तरी घाबरण्याची गरज नाही, कारण भद्राकाळ 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:52 वाजता संपेल.
1) भद्राकाळ सुरू: 8 ऑगस्ट 2025 – दुपारी 2:12 वाजता
2) भद्राकाळ समाप्त: 9 ऑगस्ट 2025 – दुपारी 1:52 वाजता
त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:52 नंतर संपूर्ण दिवसभर राखी बांधता येईल, आणि तो शुभही मानला जातो.
advertisement
Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला औक्षण कसं करावं? औक्षणाच्या ताटात काय असावं? मंत्र आणि महत्त्व!
राखी बांधण्याचा खास शुभ मुहूर्त:
ज्योतिषशास्त्रानुसार, 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी एक विशेष शुभ मुहूर्त आहे.
सुरुवात: सकाळी 5:30 वाजता
शेवट: दुपारी 1:20 वाजता
एकूण वेळ: 7 तास 50 मिनिटं
या वेळेत बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकते. विशेषतः या वेळेत भद्राकाळाचा प्रभावही नाही, त्यामुळे धार्मिकदृष्ट्याही हा अत्यंत शुभ काळ मानला जातो.
राखी कोणत्या हातावर बांधावी?
अनेक बहिणींना प्रश्न पडतो की डावखुरा भाऊ असेल तर राखी कोणत्या हातात बांधावी? शास्त्रानुसार, कोणतेही शुभकार्य उजव्या हाताने केले जातात. त्यामुळे राखीही उजव्या हातातच बांधावी, हेच शास्त्रीय मत आहे – मग भाऊ डावखुरा असो वा उजवाखुरा.
भद्राकाळातील राखी बांधणं का टाळावं?
पौराणिक कथेनुसार, भद्रा ही सूर्याची कन्या आणि यमाची बहीण होती. एकदा तिने चुकीच्या वेळी रक्षासूत्र बांधले आणि त्याचे परिणाम घातक ठरले. रावणानेही भद्राकाळात सूर्पणखेकडून राखी बांधून घेतली होती, आणि त्यानंतरच त्याचं पतन सुरू झालं. म्हणून भद्राकाळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं, असं जोशी गुरुजी सांगतात.





