Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला औक्षण कसं करावं? औक्षणाच्या ताटात काय असावं? मंत्र आणि महत्त्व!

Last Updated:

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला राखी बांधण्याइतकंच भावाच्या औक्षणालाही विशेष महत्त्व आहे. पण औक्षण नेमकं कसं करावं? याबाबत जाणून घेऊ.

+
Rakshabandhan

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला औक्षण कसं करावं? औक्षणाच्या ताटात काय असावं? मंत्र आणि महत्त्व!

मुंबई : यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी (शनिवार) साजरा होणार असून, बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला हा सण उत्साहात पार पडतो. राखी बांधण्याइतकंच भावाच्या औक्षणालाही रक्षाबंधनात विशेष महत्त्व आहे. पण औक्षण नेमकं कसं करावं? औक्षणाच्या ताटात काय असावं? कोणता मंत्र म्हणावा? या सगळ्याबाबत आदित्य जोशी गुरुजींनी मार्गदर्शन केले आहे.
औक्षण म्हणजे काय?
औक्षण म्हणजे शुभाशिर्वादासाठी केलेली ओवाळणी. रक्षाबंधन दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करून त्याला दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखसमृद्धी मिळो, यासाठी प्रार्थना करते. हे केवळ एक विधी नसून भावनिक आणि आध्यात्मिक बंधन अधिक घट्ट करणारी प्रक्रिया आहे.
advertisement
औक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू (औक्षणाचं ताट):
सुपारी – शुभतेचं प्रतीक
एक रुपयाचं नाणं / चांदीचं नाणं / सोनं – समृद्धीचं प्रतीक
सोन्याची अंगठी (पर्यायी, शुभ मानली जाते)
अक्षता – शुद्ध आणि पवित्रता दर्शवणारी
कुंकू – मंगलतेचं प्रतीक
निरंजन (तेलाचा दिवा) – प्रकाश आणि आशीर्वाद
फुलं / फुलांची माळ – सुंदरतेचा आणि प्रेमाचा भाव
advertisement
राखी (रक्षासूत्र) – प्रेमाचं बंधन
या सर्व वस्तू एका पितळेच्या किंवा तांब्याच्या ताटात सजवून ठेवाव्यात.
औक्षणाची प्रक्रिया कशी करावी?
प्रथम भावाच्या कपाळाला कुंकू आणि अक्षता लावाव्यात नंतर निरंजन (दिवा) घेऊन भावाचं तीन वेळा औक्षण करावं (घड्याळाच्या उलट दिशेने) त्यानंतर सोन्याची वस्तू (अंगठी / नाणं) घेऊन पुन्हा तीन वेळा ओवाळावं. नंतर राखी बांधावी, मिठाई खाऊ घालावी आणि आशीर्वाद द्यावा
advertisement
औक्षण करताना म्हणायचा मंत्र:
"सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते"
हा मंत्र बहिणीने औक्षण करताना म्हणावा, यामुळे भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आयुष्यातील सर्व शुभ गोष्टींचा प्रवेश होतो, असं शास्त्रात असल्याचं आदित्य जोशी सांगतात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला औक्षण कसं करावं? औक्षणाच्या ताटात काय असावं? मंत्र आणि महत्त्व!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement