Rakshabandhan 2025: यंदा रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्ट रोजी? भद्रा कधी अन् कोणत्या मुहूर्तावर बांधायची राखी? संपूर्ण माहिती

Last Updated:

Raksha Bandhan: भावा-बहिण्याच्या नात्याचा उत्सव मानला जाणारा रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर साजरा होतो. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊ.

+
यंदा

यंदा रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्ट रोजी? भद्रा कधी अन् कोणत्या मुहूर्तावर बांधायची राखी? संपूर्ण माहिती

नाशिक: रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. बहीण आणि भावाच्या नात्याचा उत्सव म्हणून हा सण सर्वत्र साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन हा सण 8 ऑगस्टला साजरा करायचा की 9 ऑगस्टला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत नाशिक येथील महंत डॉ. अनिकेत शास्त्री यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली असून शुभ मुहूर्त सांगितला आहे.
खरंतर यंदाची पौर्णिमेची तिथी 8 ऑगस्ट 2025 ला दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 9 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 21 मिनिटांनी संपणार आहे. पण हिंदू धर्मात कोणत्याही व्रत आणि सण साजरा करण्यासाठी सूर्योदय तिथी अर्थात सूर्योदयाच्या वेळी जी तिथी सुरू असते त्याला महत्त्व आहे. तर यंदा पौर्णिमेचा उदय तिथी 9 ऑगस्टला आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्टला साजरा केला जाईल, महंत अनिकेत शास्त्री सांगतात.
advertisement
रक्षाबंधन साजरा करण्याची शुभ वेळ 
यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरे केले जाईल. या वेळी भद्रा काळ 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 02:12 वाजता सुरू होईल आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 01:52 वाजता संपेल. पंचांगानुसार या दिवशी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ काळ असेल. कारण भद्रा 8 ऑगस्ट रोजीच संपलेला असेल. ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही, असं अनिकेत शास्त्री सांगतात.
advertisement
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन प्रकारचे महत्त्वाचे शुभ योग होणार आहेत व हे योग सणाचे महत्त्व वाढवत आहे. यामध्ये सौभाग्य योग व सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्टच्या सूर्योदया पासून ते दुपारी 2:15 पर्यंत राहील.
हा मंत्र म्हणून बहिणीने भावाला राखी बांधावी.
येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षेऽमा चलमाचल:।
दरम्यान, रक्षाबंधन हे भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. या वर्षी राखीच्या सणावर दोन शुभ योग देखील तयार होत आहेत. या शुभ योगात भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधणे खूपच शुभ मानले जाते. भाऊ आयुष्यभर आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. यंदाचे रक्षाबंधन सर्वांना आनंददायी जावो. सर्वांनी आनंद आणि उत्साहात हा सण साजरा करावा, असंही महंत अनिकेत शास्त्री म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Rakshabandhan 2025: यंदा रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्ट रोजी? भद्रा कधी अन् कोणत्या मुहूर्तावर बांधायची राखी? संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement