झाडू मारताना लोक ही चूक करतात -
वसंत विजय महाराज सांगतात, घर साफ करताना आपण काही चुका करतो, ज्यामुळे घरात पैशाची चणचण भासते आणि त्रास कायम राहतात. अनेकजण एकच चूक करतात, ती म्हणजे घराच्या आतून दाराकडे झाडू लावता, म्हणजेच तुम्ही घराच्या आतून झाडू लावायला सुरुवात करता आणि सर्व दाराकडे घेऊन जाता. दाराजवळच सगळा कचरा आपण गोळा करता. झाडू मारताना अनेकजण ही चूक करतात.
advertisement
राशी चक्रातील सातवी रास तूळ! स्वभाव वैशिष्ट्ये करिअर आणि प्रेम जीवनाबद्दल माहिती
घराची लक्ष्मी निघून जाईल -
त्यांच्या मते, आपण घर आतून बाहेरच्या दिशेने झाडून काढता तेव्हा तुमच्या घराची देवी लक्ष्मी देखील त्यासोबत बाहेर जाते. शास्त्रांमध्ये ही खूप मोठी बाब आहे. लक्ष्मी घरात राहण्यासाठी झाडू मारताना नेमकं काय करावं याविषयी जाणून घेऊ.
घर झाडण्याची योग्य पद्धत -
याविषयी वसंत विजय महाराजांनी लोकांना घर झाडण्याची योग्य पद्धत सांगितली. आपण घराच्या दरवाजापासून झाडू मारायला सुरुवात करावी. हॉल, खोल्या, स्वयंपाकघर इत्यादी झाडून स्वच्छ करा. मग आतील खोलीतील कचरा गोळा करा आणि कचराकुंडीत टाकून द्या.
दरवाजापासून स्वच्छता करायला सुरूवात कराल तेव्हा झाडू देवी लक्ष्मीला आपल्यासोबत घरात ओढून घेऊन येईल. अशा प्रकारे झाडू मारल्यानं त्या घरात देवी लक्ष्मीचा वास होईल आणि कधीही पैशाची अडचण भासणार नाही. ते घर आनंद, समृद्धी, संपत्ती इत्यादींनी भरलेले असेल.
यंदा कधी आहे हनुमान जयंती? पहा अचूक तिथी, पूजा-शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
