Hanuman Jayanti 2025: यंदा कधी आहे हनुमान जयंती? पहा अचूक तिथी, पूजा-शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व

Last Updated:

Hanuman Jayanti 2025: वैदिक कॅलेंडरनुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. जो हनुमान भक्त या दिवशी उपवास करून हनुमानाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.

News18
News18
मुंबई : धार्मिक शास्त्रांमध्ये हनुमान जयंतीचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. हा दिवस अर्थातच संकटमोचन हनुमानाला समर्पित आहे. हनुमान जयंतीचा सण हनुमानाची जन्मतिथी म्हणून साजरा केला जातो. वैदिक कॅलेंडरनुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. जो हनुमान भक्त या दिवशी उपवास करून हनुमानाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. तसेच अनेक त्रासांपासून सुटका मिळते. यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव 12 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. पूजेची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
हनुमान जयंती 2025 -
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, चैत्र पौर्णिमा तिथी 12 एप्रिल 2025 रोजी पहाटे 03:20 वाजता सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 05:52 वाजता संपेल. उदयतिथीद्वारे 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल.
हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त -
सकाळी पूजा मुहूर्त - 07.35 ते 09.11
संध्याकाळी पूजा मुहूर्त - 06.45 ते 08.08
advertisement
हनुमानाचे मंत्र -
हनुमानाचा मूळ मंत्र
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः॥ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्।
हनुमानाचा कवच मूळ मंत्र -
श्री हनुमते नम:
हनुमान जयंतीचे धार्मिक महत्त्व
धार्मिक ग्रंथांनुसार, हनुमान हा एकमेव देव आहेत जो आजही पृथ्वीतलावर निवास करत आहे. हनुमान जयंतीला योग्य पद्धतीने हनुमानाची पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहते. या दिवशी हनुमानाला फुले, हार, सिंदूर इत्यादी अर्पण करण्यासोबतच बूंदी, बेसनाचे लाडू, तुळशी इत्यादी पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात.
advertisement
सत्राणे उड्डाणे आरती हनुमानाची आरती आहे. ही आरती अनेकजण गातात.
या आरतीमधील काही ओळी:
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥
advertisement
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचेनि प्रसादे न भी कृतांता ॥धृ॥
या आरतीचा अर्थ असा आहे की, हनुमान आपल्या पराक्रमाने आणि हुंकाराने भूमंडळ, समुद्र आणि आकाश यांना हादरवतो. त्याच्या धाकाने ब्रह्मांडात खळबळ माजते आणि देव, मानव आणि राक्षस भयभीत होतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Hanuman Jayanti 2025: यंदा कधी आहे हनुमान जयंती? पहा अचूक तिथी, पूजा-शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement