आरतीची वेळ कोणती असावी?
पुजारी येलकर महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीची वेळ ही सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत असावी. यावेळेत आरती करणं शक्य न झाल्यास दुपारी 12 वाजण्याच्या आत आरती करून घ्यावी. संध्याकाळी सूर्यास्तानंतर 6.30 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान गणपतीची आरती करावी. पूजेसाठी शारीरिक आणि मानसिक शुद्धी महत्वाची आहे. त्यामुळे प्रसन्न आणि फ्रेश झाल्यानंतरच आरती करायला घ्यावी.
advertisement
Ganesh Chaturthi 2025: याला म्हणतात परंपरा आणि व्यवसायाची सांगड, पुण्यात इथं बनतात लाखो मोदक
आरती कोणत्या दिशेने फिरवावी?
आरती सुरू करण्याआधी गणपतीला दुर्वा, फुलं, हार अर्पण करावेत. त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा आणि नंतर आरतीला सुरुवात करावी. आरतीमधील दिवा तूप किंवा तेलाचा असावा. आरती ही नेहमी देवाच्या उजव्या बाजूने आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावी. गणपतीची आरती म्हणताना त्यातील शब्दोच्चार व्यवस्थित असावा. आरती पाठ नसल्यास पुस्तकात बघून म्हणावी. आरतीचा क्रम चुकता कामा नये. आरतीचे शब्द अर्धवट किंवा चुकीचे उच्चारू नये.
आरती झाल्यानंतर काय करावं?
आरती झाल्यानंतर आरतीचा दिवा घरात सर्वांनी ओवाळून घ्यावा. हात जोडून प्रार्थना करावी. त्यानंतर प्रसाद वाटणे, देवाला नमस्कार करणे आणि कपाळाला कुंकू लावणे ही परंपरा पाळली पाहिजे. आरती झाल्यानंतर लगेच उठून जाऊ नये किंवा गडबड करू नये.
कोणतीही पूजा करताना किंवा आरती करताना भक्तिभाव महत्त्वाचा असतो. पण, शिस्तही तितकीच गरजेची असल्याचं येलकर महाराज म्हणाले. गणेशोत्सव हे केवळ जल्लोषाचं नव्हे, तर श्रद्धेचे आणि शिस्तीचंही पर्व आहे. आरती हे भक्ती व्यक्त करण्याची अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आरती करताना या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या भक्तीला अधिक पवित्र रूप देण्याचा प्रयत्न करावा.