सागर हे लाखेचा चुडा बनविण्याचे काम वयाच्या 15 व्या वर्षापासून करत असून हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. पंढरपुरात आलेल्या महिला भाविक रुक्मिणी मातेचा आशिर्वाद म्हणून लाखेचा चुडा घालतात. तसेच महिलांसाठी अनेकजण सौभाग्याचं लेणं म्हणून गावी देखील घेऊन जातात. विशेष म्हणजे परंपरागत या चुड्यांची निर्मिती पंढरपुरातच होत आहे.
Ashadhi Wari 2025: पंढरीचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्तासेच का? तुम्हाला माहितीये का हे कारण?
advertisement
लाखेचा चुडा बनविण्याचा कच्चा माल मुंबई येथून आणला जातो. आषाढी वारीच्या जवळ पास दोन महिने अगोदर पासून लाखेचा चुडा बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. दिवसभरात 10 ते 15 जण मिळून 4 ते 5 हजार नग लाखेचा चुडा बनविले जातात. हा चुडा तयार झाल्यावर त्याची मंदिर परिसरात विक्री केली जाते. या व्यवसायातून केवळ आषाढी वारीच्या काळात 2 ते 3 लाखांची उलाढाल होत असल्याचे सागर सांगतात.
दरम्यान, लाखेच्या चुड्याने पंढरपूर मधील अनेक कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे. पंढरपुरात जवळपास 40 हून अधिक कारखान्यात जुडा बनवला जातो. बदलत्या काळात आकर्षक डिझाईनमध्ये लाखेचा चुडा बनवला जातोय आणि त्याला भाविकांची पसंती देखील मिळतेय. पंढरपूरच्या स्थानिक बाजारात महिला भाविक आवर्जून हातात चुडा घालतात. तसेच सौभ्यागाचं लेणं म्हणून इतरांना देखील देतात. चुडा बनविण्याचा व्यवसाय हा व्यवसाय नसून चुडा बनविणाऱ्या कारागिरांसाठी श्रद्धेचा व्यवसाय बनला आहे, अशी माहिती चुडा कारागीर सागर ढवारे यांनी दिली.