डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवर पूजाधाम या मंदिरात हे साहित्य मिळते. या दुकानात ब्राँझमधल्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती मिळतात. देवाचे कपडे, कापसाच्या वाती, तांब्याची भांडी , कंठी, जपमाळ, समई, दिवे अशा पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू येथे उपलब्ध आहेत.
लग्न जमत नाही ? तर, श्रावण महिन्यात शंकराची करा ‘या’ पद्धतीनं पूजा
advertisement
या दुकानात सत्य नारायण पूजेसाठी लागणारे एक खास किट मिळते. त्यामध्ये सत्यनारायणाचा एक फोटो, पूजेची पोथी, हळद, कुंकू, चंदन या सर्व गोष्टी या किटमध्ये मिळतात. त्यामुळे सत्यनारायणाच्या पूजेला कोणतीही अडचण येत नाही.
कुंडीच्या आकाराची धुपकांडी म्हणजेच धुपकप येथे उपलब्ध आहे. हा धुपकप दोन दिवस जळतो आणि त्याला चंदनाचा वास येतो. दरम्यान छोट्या आकारातील धुपकप देखील उपलब्ध आहे ती पेटवल्यानंतर तीही जवळपास दोन ते तीन तास जळते.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
August 14, 2023 1:02 PM IST