लग्न जमत नाही ? तर, श्रावण महिन्यात शंकराची करा ‘या’ पद्धतीनं पूजा
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
तुमचं लग्न जमत नसेल तर श्रावण महिन्यात 'या' पद्धतीनं शंकराची पूजा करावी. त्याचा फायदा होईल.
नागपूर, 11 ऑगस्ट : श्रावण महिन्याला मोठं धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाचं मोठं महत्त्व आहे. श्रावणात महादेवाची पूजा केल्यानं इच्छित फळ प्राप्ती होते, असं मानलं जातं. श्रावणातील प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. ज्यांचं शंकर महादेवाच्या पूजा अर्चनासह काही विशेष खबरदारी घेतल्यास पाळल्यास त्याचा व्यक्तिगत जीवनात अनुकुल परिणा दिसून येतो. विशेषत: ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी शंकराची कशा पद्धतीनं पूजा करावी याची माहिती नागपूरचे ज्योतिषशास्त्र अभ्यासक भूषण यांनी दिली आहे.
श्रावण महिन्यात दान धर्म, व्रतवैकल्य, चांगले कर्म, केल्यास पुण्य प्राप्त होत असते.आणि व्यक्तिगत जीवनात सर्वार्थाने उन्नती होत असते. याच काळात शिवाने अमृतमंथन केलं होते आणि स्वतः विष प्राशन करून सृष्टीवरील संकट आपल्यावर ओढावून सर्वांचे रक्षण केले होते. याच काळात पृथ्वीचा संपूर्ण भार हा महादेव तोलून धरतात असतो अशी अख्ययिका आहे.
advertisement
कोणती उपासना करावी?
श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल, बेलपत्र आणि पाणी चढवल्यास त्याचा अतिशय फायदा होत असतो. वैवाहिक समस्या, जसे की लग्न जमत नसल्यास, अशा व्यक्तींनी पाण्यासोबत पांढरे फुल चढवून शिवाची मनोभावे पूजा अर्चना केल्यास त्याचे नक्कीच फळ प्राप्त होऊ शकते.
advertisement
या दिवसात बेलपत्रावर पाणी वाहून ओम नमः शिवाय हा अकरा वेळा शिवनामाचा जप केल्यास रोगराई व आजारातून मुक्तता प्राप्त होत असते. धनप्राप्तीसाठी शमी पत्राची अर्पण करून नंतर ती तिजोरी ठेवल्यास धनप्राप्तीसाठी मोठी उपयुक्त ठरू शकते. अशी माहिती भूषण यांनी दिली.
हिरव्या बांगड्यांचा महत्त्व
श्रावण महिना सौभाग्यवती महिलांसाठी देखील हा महिला अतिशय पवित्र मानला जातो. या दिवसांमध्ये हिरव्या बांगड्या हातात घातल्याने सुख शांती समृद्धी आणि निरोगी आयुष्य प्राप्त होत असते. ज्यांना शनि देवाचा त्रास असेल त्यांनी या श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर शमीपत्र आणि कच्च दूध अर्पण करून महादेवाची पूजा अर्चना करावी. हे केल्याने शनि देवाचा त्रास होणार नाही.
advertisement
कोर्टकचेरीतील प्रकरण प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी अकरा बेलपत्र पानावर ओम सर्व कष्ट विनाशाय शिवाय नमः हा मंत्र जप करावा यातून आपल्यावरील संकट दूर होण्याची मोठी शक्यता असते, असंही भूषण यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 11, 2023 10:01 AM IST