श्रावण महिन्यात केस का कापत नाहीत? तुम्हाला माहिती आहे का कारण?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
श्रावण महिन्यात अनेक जण केस कापत नाहीत. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का?
डोंबिवली, 9 ऑगस्ट : श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात शंकराची उपासना केली जाते. या महिन्यात अनेक जण मांसाहार करत नाहीत तर त्याचबरोबर दाढी आणि केस कापत नाहीत. श्रावणात केस आणि दाढी न करण्यामागे नेमके कोणते कारण आहे? याची माहिती डोंबिवलीतले गुरुजी मुकुंद जोशी यांनी दिलीय.
काय आहे कारण?
चैत्र महिन्यात देवीची नवरात्र साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यात गणेश उपासना केली जाते. आश्विन महिन्यात पुन्हा देवीची उपासना केली जाते. तर, श्रावणात शंकराची उपासना केली जाते. नागपंचमी , श्रावणी सोमवार , पिठोरी अमवस्या म्हणजेच पोळा हे सण श्रावणात साजरे केले जातात. पोळा हा सण बैलांसाठी साजरा केला जातो. बैल हे शंकराचे वाहन आहे. त्याचबरोबर नागपंचमी देखील शंकराने धारण केलेल्या नागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते.
advertisement
शंकराला वैराग्य प्रिय
'शंकर जटाधारी देवता आहे. त्यांच्या जटेतून गंगा प्रकट झाली आहे. शंकराला तपश्चर्या करण्यासाठी वैराग्य प्रिय आहे. श्रावण महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात वेगवेगळे व्रत करण्यात येते. यामध्ये ब्रह्मचार्य पाळणे गरजेचे असते. ब्रह्मचर्यात केस कापणे तसंच दाढी करणे वर्ज्य असते. पार्लरला जाऊन हे सगळे करणे म्हणजे सुंदरतेला आपण आमंत्रण देतो. त्यामुळे श्रावणात वैराग्य आणि ब्रह्मचर्य राखण्यासाठी शंकर भगवान यांच्यासारखी दाढी आणि केस वाढवले जातात,' अशी माहिती जोशी यांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
August 09, 2023 3:54 PM IST