advertisement

Jalna: लग्न ठरलं, पत्रिका वाटल्या अन् नवरदेवाचा अचानक नकार, सांगितलं धक्कादायक कारण

Last Updated:

Jalna News: विवाहाचे सगळे नियोजन झाले होते. पुण्यात जाऊन बस्ता देखील बांधण्यात आला. नवरदेवाला पाच तोळे सोनेही केले.

लग्न ठरलं, पत्रिका छापल्या अन् नवरदेवाचा धक्कादायक निर्णय, वधूचं कुटुंब पोलिसांत, काय घडलं? (Ai Photo)
लग्न ठरलं, पत्रिका छापल्या अन् नवरदेवाचा धक्कादायक निर्णय, वधूचं कुटुंब पोलिसांत, काय घडलं? (Ai Photo)
जालना: विवाह ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील अतिशय खास अशी गोष्ट. वेगवेगळ्या कल्पना यावेळी माणसाच्या मनात रूंजी घालतात. सुखी संस्काराची गोड स्वप्नांची चाहूल म्हणजे विवाह संबंध जुळून येणे. परंतु, जालन्यातील एका मुलीने सुखी संसाराच्या रंगवलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. विवाह ठरला, खरेदी झाली अन् अचानक नवरदेवाने विवाहास नकार दिला आहे. आता हे प्रकरण पोलिसांत गेलंय.
नेमकं घडलं काय?
जाफराबाद तालुक्यातील एका मुलीचा विवाह देऊळगावराजा येथील तरुणाशी ठरला. सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत सर्व ठरवण्यात आलं. यानंतर लग्नाच्या तयारीसाठी लाखोंचा खर्च केला. पाहण्याचा कार्यक्रम झाला. अगदी दागिने, कपडे, नातेवाईकांसह फोटो सेशन सगळं जालं. 22 फेब्रुवारी रोजी लग्न करायचे म्हणून पत्रिका छापून त्या पाहुण्यांना वितरीत देखील करण्यात आल्या.
advertisement
नवरदेवाचा अचानक नकार
विवाहाचे सगळे नियोजन झाले होते. पुण्यात जाऊन बस्ता देखील बांधण्यात आला. नवरदेवाला पाच तोळे सोनेही केले. परंतु, अचानक नवरदेवाने विवाहास नकार नकार दिला. याप्रकरणी नवरदेवासह त्याच्या 9 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम वाकळे, सुशील वाकळे, स्वप्निल वाकळे, अमोल वाकळे यांच्यासह आदित्य रावणगावकर (पुणे) आणि काही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मुलगा नैराश्यात?
तरुणीसोबतचे अनेक फोटो तरुणाकडे आहेत. तरुण नैराश्यात असल्याने लग्न करू शकत नाही, असे अचानक सांगण्यात आले. मात्र, या सगळ्या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांचा मोठा खर्च झाला आणि अचानक फसवल्याची भावना झाल्याने तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत धाव घेतली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna: लग्न ठरलं, पत्रिका वाटल्या अन् नवरदेवाचा अचानक नकार, सांगितलं धक्कादायक कारण
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement