advertisement

"अजित पवारांची चप्पल चोरली अन्...", अमोल मिटकरींनी सांगितली काळीज चिर्र करणारी आठवण

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची एक काळीज चिर्र करणारी आठवण शेअर केली आहे.

News18
News18
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सात दिवस उलटूनही अजितदादा आता आपल्यात नाहीत, या सत्यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अजित पवारांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आता अजित पवारांच्या अपघाताबाबत विविध संशय व्यक्त केला जात आहे. विविध नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या आठवणी देखील शेअर केल्या जात आहेत.
दरम्यान, अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची एक काळीज चिर्र करणारी आठवण शेअर केली आहे. अजित पवारांमुळे आपण स्वत:चं घर बांधू शकलो. भाड्याच्या घरातून स्वत:च्या घरात राहायला येऊ शकलो. यावेळी त्यांनी अजित पवारांची चप्पल चोरल्याची आठवण देखील सांगितली आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ही आठवण सांगितली आहे.
advertisement
अमोल मिटकरी म्हणाले की, "मी माझं घर, त्या माणसाच्या पुण्याईनं बांधलं होतं. म्हणजे मी आमदार झाल्यावर बँकेनं माझं लोन पास केलं होतं. ६० ते ७० लाखांचं ते लोन होतं. यात मी माझ्या जवळचे काही पैसे टाकून घर बांधलं होतं. तेव्हा माझा हट्ट होता की दादा तुम्ही माझ्या घरी जेवायला या. एकदा-दोनदा म्हटलं पण दादा माझ्यावर ओरडले. मी एक दिवस येईल, असं सांगितलं."
advertisement
"तसेच मी पूजापाठ आणि वास्तूपूजा करत नाही. तुला जे करायचं ते करून घे, असं म्हणत त्यांनी यायला नकार दिला. यानंतर मी दादांना न सांगता देवगिरीवरून त्यांची चप्पल चोरली होती, आणि त्याची पूजा केली होती, या घटनेच्या एक महिन्यानंतर दादा माझ्या घरी आले आणि जेवण केलं" अशी आठवण मिटकरींनी सांगितली आहे.
advertisement
तसेच अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत संशयही व्यक्त केला आहे. अजित पवारांचा अपघात झाला असं वाटत नाही, त्यांच्यासोबत घातपातच झाला असावा, असा संशय मिटकरींनी व्यक्त केला. शिवाय अपघातानंतर दादांची बॉडी कशी काय फुलगी? विमानात सहा प्रवासी होते की पाच? यावरूनही त्यांनी सवालही उपस्थित केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"अजित पवारांची चप्पल चोरली अन्...", अमोल मिटकरींनी सांगितली काळीज चिर्र करणारी आठवण
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement