श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांना शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण केले जाते. अनेकांना संभ्रम असतो की ‘जव की जवस’ अर्पण करावे. परंतु धार्मिक परंपरेनुसार शिवामूठ म्हणून चौथ्या सोमवारी जवसच अर्पण करायचे आहे. यालाच आपण अळशी असं म्हणतो.
advertisement
Shiv Temple: त्रिकोणी शिवलिंग अन् थेट काशीशी कनेक्शन, अमरावतीची प्राचीन शिव मंदिरं माहितीयेत का?
शिवामूठ जवस अर्पण करण्याचे महत्त्व
श्रावण सोमवारी जवस अर्पण करण्याचे महत्त्व आहे. भगवान शिवशंकराच्या पिंडीवर प्रथम पांढरी फुले अर्पण करून दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर भक्तीभावाने जवसाची शिवामूठ वाहावी. शिवामूठ अर्पण करताना ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप किंवा रुद्राष्टक पठण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, जवस हे आरोग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात सुख-शांती आणि मंगलकारक वातावरण यावे, म्हणून चौथ्या सोमवारी हे धान्य शिवाला वाहण्याची प्रथा आहे, असे आदित्य जोशी गुरुजी सांगतात.