स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी आणली जाते. स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे. ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात. मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी. मग ती तुम्ही आणलेली असो वा भेट मिळालेली असो. त्या मूर्तीची योग्यप्रकारे पूजा होणं आवश्यक असते.
advertisement
Shree Swami Samarth : 'श्री स्वामी समर्थ' जप करताय, पण याचा अर्थ माहितीये का?
श्री स्वामी समर्थांची मूर्ती घरात ठेवण्याबाबतचे नियम
स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातून घ्यावी.
इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी. स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्त्व प्राप्त होतं.
स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी. जागेचा अभाव असेल तर जिथं आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल, अशी जागा निवडावी.
मूर्तीस्थापनेसाठी चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरू पौर्णिमा, दत्त जयंती असे दिवस निवडावेत. गुरू पुष्यामृत योगावर मुर्तीस्थापना करणंही योग्य ठरतं. जवळपास यापैकी कोणता शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास हरकत नाही.
Shree Swami Samarth : स्वप्नात आले स्वामी समर्थ, याचा अर्थ काय? हा कसला संकेत?
स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते. परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चारण करत, पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते. गुरुजी मिळत नसल्यास ताम्हनात मूर्ती घेऊन पळीपळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध आणि पाण्याने अभिषेक करत 'श्री स्वामी समर्थ ' मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा प्रतिष्ठापना करावी.
ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवा. स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचं वाटप चार घरात जरूर करा.
दररोज सकाळ-संध्याकाळ स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी.
