TRENDING:

Pradosh Vrat 2026: घरा-दाराचं कल्याण, ज्याला सापडणार आज 2 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त; शुक्रप्रदोष

Last Updated:

January Pradosh 2026 Puja Vidhi: आज शुक्र प्रदोष व्रताच्या पूजेसाठी 2 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळत आहे. हे व्रत पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरं होतं. या दिवशी व्रत आणि शिवपूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, तसेच सर्व कष्ट, रोग आणि दोष दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रदोष व्रताच्या पूजेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. जानेवारी महिन्यातील पहिला गुरू प्रदोष झाल्यानंतर आता दुसरा प्रदोष व्रत आज 16 जानेवारी, शुक्रवारी आहे. शुक्रवारी आल्यामुळे याला शुक्रप्रदोष व्रत म्हटले जाते, हा शुक्रप्रदोष ध्रुव योगामध्ये आला आहे. हा एक अतिशय शुभ योग मानला जातो. आज शुक्र प्रदोष व्रताच्या पूजेसाठी 2 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळत आहे. हे व्रत पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरं होतं. या दिवशी व्रत आणि शिवपूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, तसेच सर्व कष्ट, रोग आणि दोष दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
News18
News18
advertisement

शुक्र प्रदोष मुहूर्त - पौष कृष्ण त्रयोदशीची सुरुवात 15 जानेवारी, गुरुवारी रात्री 08:16 वाजल्यापासून झाली आहे. त्रयोदशी तिथीचा समारोप आज 16 जानेवारी, शुक्रवारी रात्री 10:21 वाजता होईल. प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:47 ते रात्री 08:29 च्या दरम्यान आहे. तसेच निशिता मुहूर्त 17 जानेवारी रोजी पहाटे 12:04 ते 12:58 पर्यंत असेल. प्रदोष व्रताची पूजा नेहमी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर केली जाते, ज्याला प्रदोष काळ म्हणतात. या काळात पूजा केल्याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.

advertisement

पूजा विधी आणि महत्त्व - आज सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजेचा संकल्प करावा. दिवसभर उपवास करून संध्याकाळी शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा करावी. पूजेमध्ये बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले आणि पंचामृत अर्पण करणे खूप फलदायी ठरेल. शुक्र प्रदोष असल्यामुळे या दिवशी महादेवासोबतच माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक आयुष्यात गोडवा येतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात.

advertisement

प्रदोष पूजा मंत्र

ओम नम: शिवाय

ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम्।

उर्व्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय।

नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय नम: शिवाय:।।

प्रदोष व्रत पूजा विधी

आज प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी 05:27 ते 06:21 या ब्रह्म मुहूर्तात स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर हातामध्ये जल आणि फुले घेऊन शिवपूजा आणि व्रताचा संकल्प करावा.

advertisement

पूजेची सुरुवात सूर्यदेवाला जल अर्पण करून आणि गणपती बाप्पाची आराधना करून करावी. त्यानंतर भगवान शंकराची दैनंदिन पूजा उरकून घ्यावी. दिवसभर उपवास करताना फलाहार घ्यावा, दुपारी झोपणे टाळावे.

संध्याकाळी प्रदोष मुहूर्ताच्या वेळी शिव मंदिरात जाऊन किंवा घरीच पूजेची तयारी करावी. पवित्र पाण्यात गंगाजल मिसळून त्याने शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. यानंतर महादेवाला बेलपत्र, चंदन, फुले, फळे, भांग, धोत्रा, शमीची पाने, मध आणि नैवेद्य अर्पण करावा. पूजा करताना 'ओम नम: शिवाय' या मंत्राचा सतत जप करावा. शंकरासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून तो त्यांना अर्पण करावा. तसेच माता गौरी, गणेश, कार्तिकेय आणि नंदी यांचीही मनोभावे पूजा करावी.

advertisement

वर्षातील पहिली बॅडन्यूज..! दिनांक 7 जानेवारीपासून 3 राशींचा मजबूत किल्ला ढासळणार

त्यानंतर शिव चालीसा वाचावी आणि शुक्र प्रदोष व्रताची कथा ऐकावी. शेवटी तुपाचा दिवा किंवा कापूर लावून शंकराची आरती करावी. पूजा पूर्ण झाल्यावर काही चूक झाली असल्यास ईश्वराकडे क्षमा प्रार्थना करावी. रात्री जागरण करून देवाची भक्ती करावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयांनंतर स्नान-पूजा उरकून गरजूंना दान-दक्षिणा द्यावी. त्यानंतर उपवास सोडावा.

शिव आरती

ओम जय शिव ओंकारा, ओम जय शिव ओंकारा।

ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्द्धांगी धारा॥ ओम जय शिव…

एकानन चतुरानन पंचानन राजे।

हंसानन गरुड़ासन वृषवाहन साजे॥ ओम जय शिव…

दो भुज चार चतुर्भुज दस भुज अति सोहे।

त्रिगुण रूपनिरखता त्रिभुवन जन मोहे॥ ओम जय शिव…

अक्षमाला बनमाला रुण्डमाला धारी।

चंदन मृगमद सोहै भाले शशिधारी॥ ओम जय शिव…

श्वेताम्बर पीताम्बर बाघम्बर अंगे।

सनकादिक गरुणादिक भूतादिक संगे॥ ओम जय शिव…

कर के मध्य कमंडलु चक्र त्रिशूल धर्ता।

जगकर्ता जगभर्ता जगसंहारकर्ता॥ ओम जय शिव…

ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका।

प्रणवाक्षर मध्ये ये तीनों एका॥ ओम जय शिव…

काशी में विश्वनाथ विराजत नन्दी ब्रह्मचारी।

नित उठि भोग लगावत महिमा अति भारी॥ ओम जय शिव…

त्रिगुण शिवजीकी आरती जो कोई नर गावे।

कहत शिवानन्द स्वामी मनवांछित फल पावे॥ ओम जय शिव…

कर्पूरगौरं मंत्र

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।

सदा बसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि।।

टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Pradosh Vrat 2026: घरा-दाराचं कल्याण, ज्याला सापडणार आज 2 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त; शुक्रप्रदोष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल