TRENDING:

सूर्याचा उत्तरायण सुरू, आता शुभ कार्य होतील; तुमच्या राशीला हा काळ धोक्याचा नाही ना?

Last Updated:

काही राशींसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. त्यांना हवं तेवढं यश या काळात मिळेल. जमीन, मालमत्तेच्या व्यवहारातून सुटका होईल. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विकाश पांडेय, प्रतिनिधी
सूर्याचा मकरप्रवेश आणि उत्तरायण नेमक्या कोणत्या राशींसाठी लाभदायी असणार, पाहूया.
सूर्याचा मकरप्रवेश आणि उत्तरायण नेमक्या कोणत्या राशींसाठी लाभदायी असणार, पाहूया.
advertisement

सतना : 15 जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला आणि देशभरात मकर संक्रांत साजरी झाली. आता सूर्याचा उत्तरायण सुरू आहे आणि सोबतच शुभ कार्यांनाही सुरुवात झाली आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मकरप्रवेशाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल. काही राशींसाठी तो अत्यंत सकारात्मक असेल, तर काही राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ चिंताजनक ठरेल. सूर्याचा मकरप्रवेश आणि उत्तरायण नेमक्या कोणत्या राशींसाठी लाभदायी असणार, पाहूया.

advertisement

उपाय अगदी सोपे पण रामबाण!...मग लक्ष्मी घरापासून दूर राहूच नाही शकणार

मेष : आपल्यासाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. आपल्याला हवं तेवढं यश या काळात मिळेल. जमीन, मालमत्तेच्या व्यवहारातून सुटका होईल. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. वाहन, जमीन किंवा दुकानखरेदी शुभ ठरेल.

चुकूनही घरात इथं करू नका पूजा, एकूण एकजण आजारी पडाल, आर्थिक नुकसानही होईल!

advertisement

वृषभ : सूर्याचा प्रभाव आपल्या कुंडलीच्या नवव्या भावात आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून थांबलेले शुभ कार्य या काळात पार पडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आपला प्रवास होईल. नोकरीत बढती मिळेल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आपली लोकप्रियता वाढेल.

मिथुन : आपल्या कुंडलीच्या अष्टम भावात सूर्य असल्यामुळे त्याचा आपल्याला लाभ होईल. आपली पदप्रतिष्ठा वाढेल, परंतु आरोग्य जपा, कारण आजार जडण्याची शक्यता आहे. अचानक धनप्राप्ती होण्याचीही शक्यता आहे, कोणाला उधार म्हणून दिलेले पैसे परत मिळू शकतात. कोर्ट-कचेरीत अडकलेले वाद आता सुटण्याची शक्यता आहे.

advertisement

कर्क : आपल्यासाठी सूर्याचा उत्तरायण सर्वसाधारण असेल. परंतु यश मिळू शकतं. कुटुंबातील भांडणामुळे मन अस्थिर राहील. दाम्पत्य जीवनात मात्र सुख येईल.

सिंह : आपल्या सहाव्या भागात असलेल्या सूर्याचा प्रभाव आपल्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. आपल्याला अपेक्षित सर्व कार्य पूर्ण होतील. प्रवास लाभदायी ठरेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमधून यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.

advertisement

कन्या : आपल्या कुंडलीत पाचव्या भावात असणारा सूर्य आपल्या यशाचा मोठा वाटेकरी आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्याला उत्कृष्ट यश मिळेल. दाम्पत्य जीवनात गोडवा येईल. केवळ ताण घेऊ नका, कारण यश आता काही दूर नाही.

तूळ : आपल्यासाठी सूर्याचा उत्तरायण चढ-उताराचा असेल. परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे नावडत्या गोष्टी कळण्याची शक्यता आहे. आजारपणही उद्भवतील. म्हणून सर्वांशी चांगलं वागावं. आपल्याकडून काही वाईट घडणार नाही ना, याची काळजी घ्यावी.

वृश्चिक : आपल्या कुंडलीच्या तृतीय भावात सूर्य असल्यामुळे तो आपल्यासाठी लाभदायी ठरेल. धार्मिक कार्यात आपण सहभागी व्हाल. अप्रत्यक्षपणे यश मिळेल. मात्र कार्यात आणखी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. दाम्पत्य जीवनात सुख येईल.

धनू : आपल्यासाठी सूर्याचा उत्तरायण शुभ ठरेल, मात्र काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आजारपण वाढण्याची शक्यता आहे. वाद-विवादांपासून दूर राहावं. कोर्ट-कचेरीची प्रकरणं संपतील. दाम्पत्य जीवन सामान्य राहील. कोणालाही पैसे उधार देऊ नये, त्यातून तुमचंच नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आणखी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

मकर : सूर्याच्या उत्तरायणात आपला मान-सन्मान वाढेल. नोकरीत, व्यवहारात यश मिळेल. गुंतवणूकीतूनही फायदा होईल. केवळ आरोग्य जपा.

कुंभ : या उत्तरायणात आपल्याला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणालाही पैसे उधार देऊ नये. नाहीतर तुमचेच पैसे तुम्हाला वेळेवर मिळणार नाहीत.

मीन : आपल्यासाठी सूर्याचा उत्तरायण लाभदायी ठरेल. दाम्पत्याला गोड बातमी मिळू शकते. मुलांसंबंधित सर्व चिंता दूर होतील. जमीन, मालमत्तेच्या वादात आपल्याला यश मिळेल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/अध्यात्म/
सूर्याचा उत्तरायण सुरू, आता शुभ कार्य होतील; तुमच्या राशीला हा काळ धोक्याचा नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल