पंडितजींनी सांगितले की ग्रहण नेहमी पौर्णिमा किंवा अमावास्येला होते. या दरम्यान, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप प्रभावी असते. जी केवळ प्राण्यांवरच नाही तर समुद्राला देखील प्रभावित करते. चंद्रावर पाण्याचे वर्चस्व आहे, ज्यामुळे पाणी सापडलेल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. यामुळेच ग्रहण काळात प्राणी विचित्र वर्तन करू लागतात.
एका अहवालानुसार, ग्रहण काळात कोळ्यांच्या (कोष्टी) काही प्रजातींमध्ये काही विचित्र वर्तन पाहायला मिळते. ग्रहण काळात, कोळी अस्वस्थ होतात आणि आपले जाळे तोडतात आणि ग्रहण संपल्याबरोबर ते पुन्हा विणणे सुरू करतात.
advertisement
Navratri: नवरात्रीमध्ये भेट द्यावी अशी महाराष्ट्रातील देवीची 9 प्रसिद्ध मंदिरे
त्याच वेळी ग्रहणाच्या वेळी रात्र असल्याच्या भ्रमात वटवाघुळं इकडे तिकडे अस्वस्थपणे उडू लागतात. याशिवाय अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या माकडांची एक प्रजाती, ज्याला नाईट मंकी म्हणून ओळखले जाते, ते सहसा खूप उड्या मारतात पण ग्रहण सुरू असताना ते घाबरतात आणि झाडांवर थोडं चालायलाही घाबरतात.
पाण्यात राहणारा पाणघोडादेखील सूर्यग्रहण सुरू होताच घाबरतो. तो दुष्काळ पडल्यासारखा पाण्यापासून दूर पळू लागतो. निम्म्या रस्त्यातच जर ग्रहण संपलं तर तो परत पाण्याकडे जाऊ लागतो.
शास्त्रज्ञांनी जंगली बर्फाच्छादित बदक गीजचे संशोधन केलं. शास्त्रज्ञांनी त्या बदकाच्या शरीरात एक छोटी चीप लावली होती, ज्यावरून असे दिसून आले की ग्रहणकाळात या बदकांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि ग्रहण संपताच ते सामान्य स्थितीत येतात.
Pitru Paksha 2023: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचा आणि पूर्वजांचा काय संबंध असतो?
(सूचना : येथे दिलेली माहिती ग्रहणांविषयी सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)