मुंबई: आज माघी गणेश जयंतीनिमित्त भाविकांची राज्यभरातल्या मंदिरामध्ये मांदियाळी पाहायला मिळतेय. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीये. माघी गणेश जयंतीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून लगबग सुरु असतानाच हा दिवस उजाडला आणि सर्वत्र या दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंगळवारच्याच दिवशी गणेश जयंतीचा योग आल्यामुळे याबाबत भाविकांमध्येही विशेष आनंद पाहायला मिळत आहे.
advertisement
सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात रांगा लावल्या आहेत. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसर भाविकांनी गजबजल्याचं पाहायला मिळत आहे. आजच्या दिवशी होणारी गर्दी पाहता भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून काही विशेष गोष्टींची काळजी घेण्यात येत आहे.
काशीप्रमाणेच कोल्हापुरातही या गणेशाची होते पूजा, गणेश जयंती बद्दलची ही माहिती माहितीये का? Video
दरम्यान, गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून ढुंढिराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात येतं. तसेच प्राचीन प्रथांनुसार, गणेश जयंती तसेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई केली जाते.
विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी यातील फरक माहितीये का? जाणून घ्या महत्त्व, Video
महाराष्ट्रातील गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराप्रमाणेच रत्नागिरीतील गणपतीपुळे, पुण्यातील दगडूशेठ हलवाई, अष्टविनायक मंदिरे या ठिकाणी मोठ्या थाटामाटात गणेश जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. यासह इतर गणपती मंदिरांमध्येही या दिवशी विशेष पूजा-अर्चना होत असून सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.