TRENDING:

Siddhivinayak Mandir: सिद्धिविनायक दर्शन 5 दिवसांसाठी बंद, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार

Last Updated:

Shree Siddhivinayak Ganapati Mandir Darshan: मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. बुधवारपासून ‘श्रीं’चं मुखदर्शन 5 दिवस बंद राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अगदी जगभरातून भाविक येत असतात. परंतु, आता बुधवारपासून 5 दिवस सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार नाही. दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूर लेपन केले जाते. या काळात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद असतं.
सिद्धिविनायक दर्शन 5 दिवसांसाठी बंद, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार
सिद्धिविनायक दर्शन 5 दिवसांसाठी बंद, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार
advertisement

प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात बुधवार, दि. 11 डिसेंबर ते रविवार दि. 15 डिसेंबर या कालावधित श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद राहणार आहे. परंतु, भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाईल. या काळात मंदिरातील सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

advertisement

Numerology: दुसऱ्यांच्या बोलण्यावर विसंबला तो संपला, नव्या वर्षात 4 मूलांक असलेल्यांना धोक्याचा इशारा, पाहा काय म्हणतात ज्योतिष

या दिवशी पुन्हा सुरू होणार दर्शन

सिंदूर लेपन विधीसाठी सिद्धिविनायक दर्शन 5 दिवस बंद राहणार आहे. त्यानंतर सोमवार, दिनांक 16 डिसेंबर 2024 या दिवशी गाभाऱ्यामध्ये स्थलशुद्धी प्रीत्यर्थ उदकशांत आणि प्रोक्षण विधी हा धार्मिक विधी होईल. त्यानंतर श्रींची महापूजा, नैवद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजल्या पासून भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन दिले जाईल.

advertisement

मारुतीचे दर्शनही बंद

दरवर्षी सिद्धिविनायकासोबतच श्रीमारुतीचे देखील सिंदूर लेपन करण्यात येते. यंदारही प्रतिवर्षाप्रमाणे हा विधी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत श्रीमारुतीचे दर्शन बंद राहील. सोमवार दिनांक 16 डिसेंबर पासून श्रीमारुतीवर संक्षिप्त चालन विधी करून पहाटे भाविकांना श्रीमारुतीचे दर्शन चालू होईल. त्यानंतर भाविक श्री मारुतीचे दर्शन घेऊ शकतील.

गैरसोय टाळण्यासाठी..

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

प्रभादेवी मधील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास याठिकाणी श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दररोज अनेक भाविक येतात. आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच येणाऱ्या सगळ्या भाविकांनी या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती मंदिरातल्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांना केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Siddhivinayak Mandir: सिद्धिविनायक दर्शन 5 दिवसांसाठी बंद, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल