शंभू महादेव हे तीर्थस्थान जालना शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना-मंठा हायवेवर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पक्या रस्त्याची सोय आहे. तुम्ही बाईक किंवा फोर व्हीलरचा वापर करून याठिकाणी जाऊ शकता. सध्या याठिकाणी सार्वजनिक वाहनाची व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. मात्र, हा परिसर अतिशय रम्य असल्याने अनेक भाविक आणि पर्यटक खासगी वाहनांचा वापर करून येथे येतात. या ठिकाणी शिवभक्तीमध्ये लीन झालेले भक्त आणि निसर्गाचं सौंदर्य डोळ्यांत भरून घेणारे पर्यटक यांचा याठिकाणी सुरेख संगम आढळतो.
advertisement
Beed Tourism: विहंगम दृश्य अन् अध्यात्मिक शांतता, इथं श्रावणात होते हजारोंची गर्दी
प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवासात असताना काही काळ दंडकारण्यात वास्तव्याला होते. शंभू महादेव हे ठिकाण तत्कालीन दंडकारण्याचा भाग होते, असं ग्रामस्थ सांगतात. वनवास काळात राम, लक्ष्मण आणि सीता यांनी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे देखील दाखले आहेत. या परिसरामध्ये असलेला शंभूराक्षस परिसरातील नागरिकांना त्रस्त करत असे. येथील वास्तव्यादरम्यान लक्ष्मणाच्या कानावर ही बाब आली. त्यानंतर लक्ष्मणाने या राक्षसाचा वध केला. पण, हा राक्षस शिवभक्त असल्याचं श्रीरामांच्या लक्षात आलं. तेव्हा श्रीरामाने या राक्षसाला वर दिला. तेव्हापासून याठिकाणी 'शंभू महादेव' या नावाने शंकराची पूजा होते, अशी आख्यायिका आहे.
या तीर्थस्थळापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेलं 'नांगरतास' हे ठिकाण देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. याठिकाणी श्रीरामचंद्रांनी नांगर चालवल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यावरूनच या तीर्थस्थळाचे नाव नांगरतास पडले. पूर्वी हे ठिकाण अनेकांच्या परिचयाचे नव्हते. पण, आता मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा मोठमोठ्या जिल्ह्यांतून आणि शहरातून नागरिक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.