Beed Tourism: विहंगम दृश्य अन् अध्यात्मिक शांतता, इथं श्रावणात होते हजारोंची गर्दी
- Reported by:Prashant Pawar
- local18
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून गोरक्षनाथ टेकडी ओळखली जाते. बीड शहरापासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर असलेली ही टेकडी श्रद्धाळू भाविकांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानली जाते.
बीड: जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून गोरक्षनाथ टेकडी ओळखली जाते. बीड शहरापासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर असलेली ही टेकडी श्रद्धाळू भाविकांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानली जाते. दरवर्षी असंख्य भक्तगण गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात. या टेकडीवर गोरक्षनाथ महाराजांचे मंदिर असून परिसरात शांतता आणि अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येतो. सद्गुरू संत किसन बाबा आणि संत नवनाथ बाबा यांसारखे संत या टेकडीला लाभले आहेत.
स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने या टेकडीवर एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे. विविध प्रकारची झाडे, फुलझाडे आणि सुशोभित रचना यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक चांगला अनुभव मिळतो. उद्यानामध्ये फिरण्यासाठी रस्ता, बाग आणि विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
advertisement
गोरक्षनाथ टेकडी हे फक्त धार्मिक स्थळ न राहता एक पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होत आहे. येथील निसर्गरम्य वातावरण, टेकडीवरून दिसणारं विहंगम दृश्य आणि अध्यात्मिक शांतता यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः श्रावण महिन्यात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या काळात येथे विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
advertisement
या ठिकाणाच्या विकासात स्थानिक ग्रामस्थांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि भाविकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवला जात आहे. यामुळे गोरक्षनाथ टेकडी ही एक आदर्श धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे.
राज्य शासन आणि पर्यटन विभागाकडून देखील या ठिकाणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. भविष्यात येथे आणखी पर्यटन सुविधा, माहिती केंद्र, लघुपट व दृष्य प्रणाली यांची भर पडणार आहे. त्यामुळे गोरक्षनाथ टेकडी ही भाविकांप्रमाणेच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे ठिकाण ठरेल.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Aug 03, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Tourism: विहंगम दृश्य अन् अध्यात्मिक शांतता, इथं श्रावणात होते हजारोंची गर्दी








