श्रावण सोमवारी करा हे उपाय
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भक्त भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाभिषेक करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, सोमवारी भगवान शंकरासाठी उपवास केला जातो आणि रुद्राभिषेकही केला जातो. अशी धार्मिक श्रद्धा आहे की, श्रावणी सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख, समृद्धी व सौभाग्य लाभते. जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल, तर श्रावण्याच्या पहिल्या सोमवारी काही आवश्यक उपाय करू शकता.
advertisement
या वस्तू आणा घरी
अयोध्याचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, पवित्र श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर श्रावणी सोमवारी काही वस्तू घरी आणल्या पाहिजेत. जसे की रुद्राक्ष, पारद शिवलिंग, त्रिशूळ आणि गंगाजल.
1) जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटाने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका मिळवू इच्छित असाल, तर श्रावणी सोमवारी एकमुखी रुद्राक्ष घरी आणा आणि तो तिजोरीच्या जवळ ठेवा. असे केल्याने वास्तू दोषही दूर होतात आणि जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
2) श्रावणात तुम्हाला भोलेनाथाची विशेष कृपा प्राप्त करायची असेल, तर सोमवारी पारद शिवलिंग घरी आणा आणि त्याची उत्तर दिशेला स्थापना करा. असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य टिकून राहते.
3) जर तुम्ही एखाद्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका मिळवू इच्छित असाल, तर अशा परिस्थितीत तुम्ही श्रावणी सोमवारी घरी त्रिशूळ आणायला हवा.
हे ही वाचा : 6 जुलैला करा हे खास उपाय, लक्ष्मी होईल प्रसन्न अन् वैवाहिक जीवनातील अडचणी होतील दूर!
हे ही वाचा : Shravan 2025: श्रावणात दही का खाऊ नये? 'ही' आहेत त्यामागील धार्मिक अन् वैज्ञानिक कारणं!